Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Diwali : ‘ट्रम्प यांच्या हाती ‘हनुमान चालिसा…’; ओव्हल ऑफिसमधील दिवाळी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Trump Diwali : डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये भारतीय समुदायाच्या सदस्यांसोबत दिवाळी साजरी केली. भारतीय वंशाचे उद्योगपती विशाल गोंडल यांनी त्यांना हनुमान चालिसा भेट दिली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 07, 2026 | 04:30 PM
Trump White House Diwali Vishal Gondal Hanuman Chalisa

Trump White House Diwali Vishal Gondal Hanuman Chalisa

Follow Us
Follow Us:
  • व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी
  • हनुमान चालिसा भेट
  • वांशिक द्वेषाचा प्रश्न आणि राजकारण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump Diwali) यांनी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये भारतीय वंशाच्या नामांकित उद्योगपती आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात दिवाळी साजरी केली. अमेरिकेच्या वेळेनुसार शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. या सोहळ्यात भारतीय वंशाचे प्रसिद्ध उद्योजक विशाल गोंडल, मिशेलिन-स्टार शेफ विकास खन्ना आणि कॅनडाच्या माजी खासदार रुबी धल्ला यांच्यासह भारतीय-अमेरिकन समुदायातील अनेक प्रभावशाली व्यक्ती उपस्थित होत्या.

या विशेष प्रसंगी भारतीय उद्योजक विशाल गोंडल यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची व्यक्तिगत भेट घेतली आणि त्यांना ‘हनुमान चालिसा’ची एक प्रत सप्रेम भेट दिली. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची छायाचित्रे सध्या जगभरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

 विशाल गोंडल यांनी दिली हनुमान चालिसा भेट

व्हाईट हाऊसमध्ये दिवा प्रज्वलित करताना आणि ट्रम्प यांना हनुमान चालिसा सुपूर्द करतानाचा अनुभव विशाल गोंडल यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केला. गोंडल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळी साजरी करणे हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा क्षण आहे. संत तुलसीदासांनी प्रभू श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमान यांच्या स्तुतीसाठी रचलेली ‘हनुमान चालिसा’ ट्रम्प यांना भेट देताना मला अत्यंत अभिमान वाटला. आपल्या देशातील कोट्यवधी नागरिक धैर्य, शक्ती आणि भक्ती मिळवण्यासाठी दररोज याचे पठण करतात.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NASA : नासाचा ऐतिहासिक पराक्रम! व्हॉयेजर 1 अंतराळयान गाठणार ‘वन-लाइट-डे’ अंतर; पृथ्वीपासून होणार अथांग दूर

त्यांनी पुढे नमूद केले की, व्हाईट हाऊसमध्ये पारंपरिक दिवे लावताना त्यांनी भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील मैत्रीचे संबंध अधिक दृढ व्हावेत आणि अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाचा प्रकाश विजय मिळवो, अशी प्रार्थना केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही या प्रसंगी भारतीय समुदायाला “जुग जुग जिओ” (Jug Jug Jiyo) असा पारंपरिक भारतीय आशीर्वाद देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

A moment of shared light in the Oval Office. 🪔 Honored to celebrate Diwali with President @realDonaldTrump and proud to gift him with a copy of the Hanuman Chalisa, Tulsidas’s hymn to Lord Hanuman that millions of us recite for courage, devotion and strength. As the diyas were lit, my prayer was for friendship between India and America, and for the triumph of light over darkness. Jug Jug Jiyo, a blessing many of us grew up hearing, means “may you live for ages.” It is the wish behind everything I do, and today I made it for everyone around the world: peace, prosperity, good health and longevity. Happy Diwali. Jug Jug Jiyo. 🙏 @TheVikasKhanna @DhallaRuby @WhiteHouse — Vishal Gondal (@vishalgondal) November 6, 2026

credit – social media and Twitter

 मध्यावधी निवडणुका आणि भारतीय वंशाच्या मतदारांचे राजकीय गणित

अमेरिकेतील राजकीय विश्लेषकांच्या मते, या दिवाळी उत्सवाला केवळ सांस्कृतिकच नव्हे तर मोठे राजकीय परिमाणही लाभले आहे. नुकत्याच पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी या दिवाळी सोहळ्यात सहभाग घेतला आहे. अमेरिकेतील निवडणुकांच्या आकडेवारीनुसार, अध्यक्षीय निवडणुकीत भारतीय-अमेरिकन मतदारांच्या एका मोठ्या घटकाने ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा दिला होता; मात्र मध्यावधी निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या मतदारांचा कल डेमोक्रॅटिक पक्षाकडे झुकल्याचे पाहायला मिळाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : White House : कोण आहेत स्टीफन मिलर? निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी का बनवले व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ

त्यामुळेच, भारतीय समुदायाशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि आगामी काळात राजकीय पाठिंबा कायम ठेवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून हा सांस्कृतिक संवाद घडवून आणला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 अमेरिकेत भारतीयांविरुद्ध वाढणारा वांशिक हिंसाचार थांबणार का?

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असला, तरी दुसरीकडे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये सुरक्षेबाबतची चिंता कायम आहे. ट्रम्प यांच्या ‘मागा’ (MAGA – Make America Great Again) मोहिमेतील काही कट्टर समर्थकांच्या विषारी वक्तृत्वामुळे आणि उजव्या विचारांच्या तीव्रतेमुळे अमेरिकेत आशियाई आणि भारतीय वंशाच्या लोकांविरुद्ध वांशिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप विविध संघटनांकडून केला जात आहे.

गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतील भारतीय मंदिरांना लक्ष्य करण्याचे आणि द्वेषातून होणाऱ्या गुन्ह्यांचे (Hate Crimes) प्रमाण वाढले आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत एका हिंदू मंदिरावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता; मात्र सुदैवाने बंदुकीची गोळी अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या पार्श्वभूमीवर, व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी साजरी केलेली दिवाळी केवळ एक औपचारिक कार्यक्रम ठरेल की यामुळे अमेरिकेतील भारतीयांविरोधातील वांशिक द्वेष खरोखरच कमी होईल, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

 व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी दीपप्रज्वलनाची ऐतिहासिक परंपरा

व्हाईट हाऊसच्या अधिकृत निवासस्थानात दिवाळी साजरी करण्याची परंपरा नवीन नाही. या परंपरेची सुरुवात २००३ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी केली होती. सुरुवातीच्या काळात हे कार्यक्रम प्रामुख्याने आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंगमध्ये पार पडायचे, ज्यामध्ये भारतीय-अमेरिकन नागरिक आणि भारतीय राजनैतिक अधिकारी सहभागी होत असत.

त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसच्या मुख्य ‘ईस्ट रूम’मध्ये स्वतः पहिला दिवा लावून या परंपरेला एक नवे आणि भव्य रूप दिले. तेव्हापासून आजपर्यंत, ओव्हल ऑफिस आणि रूझवेल्ट रूमसह व्हाईट हाऊसच्या विविध महत्त्वाच्या दालनांमध्ये दिवाळीचा दीपप्रज्वलन सोहळा अखंडपणे आयोजित केला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमध्ये हनुमान चालिसा कोणी भेट दिली?

    Ans: भारतीय वंशाचे प्रसिद्ध उद्योगपती विशाल गोंडल यांनी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हनुमान चालिसा भेट दिली.

  • Que: व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा कोणी सुरू केली?

    Ans: व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा २००३ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी सुरू केली होती.

  • Que: ट्रम्प यांच्या दिवाळी कार्यक्रमाला कोणकोणते प्रमुख भारतीय उपस्थित होते?

    Ans: या कार्यक्रमाला उद्योगपती विशाल गोंडल, प्रसिद्ध शेफ विकास खन्ना, कॅनडाच्या माजी खासदार रुबी धल्ला आणि भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा उपस्थित होते.

Web Title: Donald trump celebrates diwali at white house gets hanuman chalisa hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

SCO 2026 : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान नवी दिल्लीकडून पाकिस्तानला निमंत्रण; एससीओ परिषदेला हजार राहणार का शहबाज शरीफ?
1

SCO 2026 : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान नवी दिल्लीकडून पाकिस्तानला निमंत्रण; एससीओ परिषदेला हजार राहणार का शहबाज शरीफ?

Naraka Chaturdashi: नरक चतुर्दशीला उटण लावण्याची का आहे परंपरा? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व
2

Naraka Chaturdashi: नरक चतुर्दशीला उटण लावण्याची का आहे परंपरा? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

Hacker Army: उत्तर कोरियाने कशी तयार केली जगातील सर्वात धोकादायक ‘हॅकर आर्मी’? बायनान्स हॅकिंग प्रकरणाने जगात खळबळ
3

Hacker Army: उत्तर कोरियाने कशी तयार केली जगातील सर्वात धोकादायक ‘हॅकर आर्मी’? बायनान्स हॅकिंग प्रकरणाने जगात खळबळ

Israel : निवडणुकीपूर्वी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत होते इस्रायली अध्यक्ष नेतन्याहू; अमेरिकेने मध्यस्थीने कसा रोखला हा कट?
4

Israel : निवडणुकीपूर्वी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत होते इस्रायली अध्यक्ष नेतन्याहू; अमेरिकेने मध्यस्थीने कसा रोखला हा कट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.