Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026: दिवाळीचा आनंद फक्त स्वतःपुरता नको! साहित्यिकांनी सांगितला सण साजरा करण्याचा नवा मंत्र

Diwali 2026: दिवाळी अंकांचे वाचन, साहित्याचा फराळ, कुटुंबासोबतचा वेळ, गरजूंना मदत आणि बदलत्या काळातील सण साजरा करण्याच्या नव्या पद्धती अशा विविध पैलूंमधून साहित्यिकांनी दिवाळीचा अर्थ उलगडला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 08, 2026 | 02:35 AM
साहित्याचा फराळ, नात्यांचा गोडवा आणि माणुसकीचा प्रकाश

साहित्याचा फराळ, नात्यांचा गोडवा आणि माणुसकीचा प्रकाश

Follow Us
Follow Us:
  • साहित्याचा फराळ, नात्यांचा गोडवा आणि माणुसकीचा प्रकाश
  • दिवाळी अंकांच्या वाचनापासून गरजूंना मदतीपर्यंत
  • बदलत्या काळातही जपला जातोय सणाचा आपलेपणा
Pune/Diwali 2026: दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर येतात पणत्यांची रोषणाई, रांगोळी, फराळाचा सुगंध आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी. मात्र, साहित्यिकांसाठी दिवाळीचा आनंद केवळ सणापुरता मर्यादित नसून त्याला साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचीही जोड असते. दिवाळी अंकांचे वाचन, साहित्याचा फराळ, कुटुंबासोबतचा वेळ, गरजूंना मदत आणि बदलत्या काळातील सण साजरा करण्याच्या नव्या पद्धती अशा विविध पैलूंमधून साहित्यिकांनी दिवाळीचा अर्थ उलगडला आहे. त्यांच्या मते, दिवाळीचा खरा आनंद हा स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत पोहोचविण्यात आहे.

साहित्यिक चंद्रलेखा बेलसरे यांच्या मते, दिवाळी हा साहित्यिकांसाठी केवळ दीपोत्सव नसून साहित्य महोत्सव असतो. दिवाळी अंकांची तयारी जून महिन्यापासून सुरू होते आणि दसऱ्यापर्यंत अंकांचे काम पूर्ण करून ते वाचकांपर्यंत पोहोचविण्याची लगबग असते. नातेवाईक आणि मित्रमंडळींना फराळासोबत दिवाळी अंकांचा साहित्य फराळ भेट देण्याची परंपराही त्या जपतात. कथा, कविता, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक विषयांनी समृद्ध असलेल्या दिवाळी अंकांचे वाचन ही वाचकांसाठी पर्वणी असते. त्याचबरोबर गावाकडील शेतमजूर, गरजू कुटुंबे आणि त्यांच्या मुलांना कपडे, फराळ आणि खाऊ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा त्या प्रयत्न करतात. फटाक्यांवर खर्च करण्यापेक्षा तो पैसा गरजूंच्या मदतीसाठी वापरण्यात अधिक समाधान असल्याचे त्या सांगतात.

Diwali Food Poisoning: सणाचा गोडवा पडू शकतो महागात! मिठाईपासून फराळापर्यंत, खाण्याच्या चुका टाळा

मिलिंद जोशी यांच्या मते, संवादाची माध्यमे आणि सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे प्रत्यक्ष भेटीगाठी कमी झाल्या आहेत. त्यामुळे सणांच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे, गप्पा मारणे आणि आनंद वाटून घेणे ही परंपरा पुन्हा जपण्याची गरज आहे. ते एक वर्ष दिवाळीत पर्यटनासाठी बाहेर जातात, तर दुसऱ्या वर्षी घरी राहून कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतात. पर्यटनापेक्षा घरात फराळ बनवणे, सजावट आणि सणाच्या तयारीत सहभागी होणे त्यांना अधिक आवडते. पुण्यात दिवाळी पहाट, दिवाळी दुपार आणि दिवाळी संध्याकाळ अशा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नव्या संकल्पना रुजत आहेत. बदलत्या काळातील या गोष्टी स्वीकारताना जुन्या परंपरांमधील आपलेपणा आणि प्रत्यक्ष भेटींची ऊब जपली पाहिजे, असा संदेश ते देतात.

साहित्यिक शैफाली वैद्य दिवाळीकडे माणुसकी आणि संवेदनशीलतेच्या दृष्टिकोनातून पाहतात. नोकरी किंवा शिक्षणासाठी कुटुंबापासून दूर राहणाऱ्या व्यक्तींना दिवाळीत एकटेपणाची जाणीव अधिक तीव्रतेने होते. मुंबईत करिअरच्या सुरुवातीच्या काळात एकटेपणाचा अनुभव घेतल्यामुळे अशा व्यक्तींना सणाच्या आनंदात सहभागी करून घेण्याचे महत्त्व त्यांना जाणवते. एकटे राहणारे ज्येष्ठ, कामानिमित्त घरापासून दूर असलेले तरुण आणि सणासुदीतही काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळ, आपुलकी आणि छोटीशी भेट द्यावी, असे त्या सांगतात. महागड्या भेटवस्तूंपेक्षा एकमेकांसोबत घालवलेले क्षण अधिक महत्त्वाचे आहेत. ज्येष्ठांच्या आठवणी ऐकणे, मुलांना पारंपरिक खेळ आणि पुस्तके देणे, स्थानिक कारागिरांच्या वस्तू भेट देणे तसेच घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि सुट्टी देणे यातूनही दिवाळीचा आनंद वाढवता येतो.

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला यमदीप लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या नियम आणि परंपरा

साहित्यिकांच्या या वेगवेगळ्या विचारांतून दिवाळीचे अनेक अर्थ समोर येतात. कुणासाठी ती साहित्याची पर्वणी आहे, कुणासाठी नाती जोडण्याची संधी, तर कुणासाठी गरजूंच्या आयुष्यात आनंदाचा दिवा लावण्याचे निमित्त. मात्र, या सर्व विचारांचा समान धागा म्हणजे सण साजरा करताना माणुसकी, आपलेपणा आणि सामाजिक जबाबदारी जपणे हाच आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: साहित्यिक चंद्रलेखा बेलसरे यांनी दिवाळीबाबत काय सांगितले?

    Ans: दिवाळी हा साहित्यिकांसाठी केवळ दीपोत्सव नसून साहित्य महोत्सव असतो. दिवाळी अंकांची तयारी जून महिन्यापासून सुरू होते आणि दसऱ्यापर्यंत अंकांचे काम पूर्ण करून ते वाचकांपर्यंत पोहोचविण्याची लगबग असते.

  • Que: साहित्यिक शैफाली वैद्य दिवाळीकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतात?

    Ans: साहित्यिक शैफाली वैद्य दिवाळीकडे माणुसकी आणि संवेदनशीलतेच्या दृष्टिकोनातून पाहतात.

Web Title: Marathi writers in pune shared new ideas regarding the celebration of diwali tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • Marathi Literature
  • navarashtra special
  • pune news

संबंधित बातम्या

शिक्षकांचे वेतन थकले, शिकवणी बंद पडली; सिंहगडच्या १३ शाळांबाबत न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय
1

शिक्षकांचे वेतन थकले, शिकवणी बंद पडली; सिंहगडच्या १३ शाळांबाबत न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय

Trump Diwali : ‘ट्रम्प यांच्या हाती ‘हनुमान चालिसा…’; ओव्हल ऑफिसमधील दिवाळी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
2

Trump Diwali : ‘ट्रम्प यांच्या हाती ‘हनुमान चालिसा…’; ओव्हल ऑफिसमधील दिवाळी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Naraka Chaturdashi: नरक चतुर्दशीला उटण लावण्याची का आहे परंपरा? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व
3

Naraka Chaturdashi: नरक चतुर्दशीला उटण लावण्याची का आहे परंपरा? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

Pune Metro Line 3: पुणेकरांनो लक्ष द्या! दिवाळीनिमित्त हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ च्या वेळांमध्ये मोठा बदल
4

Pune Metro Line 3: पुणेकरांनो लक्ष द्या! दिवाळीनिमित्त हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ च्या वेळांमध्ये मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.