Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabharat Navratri Story: रावणसोबतच या पांडवानेही केली देवी दुर्गेची पूजा

चैत्र नवरात्रीचा सण हा अत्यंत पवित्र आणि भक्तीभावाने साजरा केला जाणारा सण आहे. बहुतेकांना रावणने देवीची कठोर साधना केल्याची कथा माहीत असते, पण महाभारतातील एका पांडवानेही देवी दुर्गेची आराधना केली होती.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 16, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • महाभारतामधील नवरात्रीची कथा
  • रावणसोबतच या पांडवानेही केली देवी दुर्गेची पूजा
  • नवरात्रीमध्ये पूजेचे महत्त्व
 

हिंदू धर्मामध्ये नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी चैत्र नवरात्र गुरुवार, १९ मार्च रोजी सुरू होणार आहे आणि २७ मार्च रोजी याची सांगणार होणार आहे. जेव्हा जेव्हा आपण नवरात्री आणि अधर्मावर धर्माच्या विजयाबद्दल बोलतो तेव्हा नवरात्रीची पूजा आणि भगवान रामाने रावणाचा वध केल्याची घटना आपल्या लक्षात येते. तुम्हाला माहिती आहे का की रावणाव्यतिरिक्त, महाभारत काळात एका पांडवानेही युद्धभूमीत प्रवेश करण्यापूर्वी देवी दुर्गेची विशेष प्रार्थना केली होती? काय आहे ही आख्यायिका जाणून घ्या

अर्जुनाने केली होती देवी दुर्गेची पूजा

पौराणिक कथेनुसार, पांडवांपैकी एक असलेल्या अर्जुनानेही दुर्गा देवीची विशेष पूजा केली होती. असे म्हटले जाते की जेव्हा महाभारत युद्ध सुरू होणार होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दुर्गा देवीची पूजा करण्याचा सल्ला दिला. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की जर त्याला युद्ध जिंकायचे असेल तर त्याने प्रथम देवी दुर्गेची पूजा करावी. कृष्णाच्या सल्ल्यानुसार, अर्जुनाने पूर्ण भक्तीने आणि सर्व विधींचे पालन करून देवी दुर्गेची पूजा केली.

Mahabharat Katha: दुर्योधनाचा अंत आणि अश्वत्थामाची मोठी चूक, महाभारतातील महत्त्वाच्या घटना जाणून घ्या

देवीने विजयाचा आशीर्वाद दिला

कथेनुसार, अर्जुनाच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी दुर्गा प्रकट झाली आणि त्याला युद्धात विजयाचा आशीर्वाद दिला. देवीने घोषित केले की धर्माच्या रक्षणासाठी पांडव हे युद्ध निश्चित जिंकतील. त्यानंतर अर्जुन पूर्ण आत्मविश्वासाने युद्धात उतरला आणि शेवटी महाभारतात पांडव विजयी झाले. म्हणूनच, नवरात्रीत दुर्गेची पूजा करणे हे शक्ती, धैर्य आणि विजयाचे प्रतीक मानले जाते.

रावण देखील दुर्गा देवीचा भक्त

पौराणिक कथेनुसार, रावण हा दुर्गा देवीचा एक महान भक्त होता. त्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक वेळा कठोर तपस्या आणि यज्ञ केले. असे मानले जाते की त्याने शक्ती प्राप्त करण्यासाठी विशेष ध्यान केले.

Hindu Nav Varsh 2026: हिंदू नववर्षाला कडुलिंबाची पाने पाण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या फायदे

नवरात्री पूजेचे महत्त्व

नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. या दिवसांत उपवास, पूजा आणि दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा केल्याने भीती, अडथळे आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्तता मिळते आणि जीवनात यशाचा मार्ग मोकळा होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पौराणिक कथेनुसार, केवळ रावणानेच नव्हे तर महाभारतातील महान धनुर्धर अर्जुनाने देखील देवी दुर्गेची पूजा केली आणि देवीच्या आशीर्वादाने विजय मिळवला.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाभारतात कोणत्या पांडवाने देवी दुर्गेची पूजा केली होती?

    Ans: महाभारत कथेनुसार कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी अर्जुन यांनी देवी दुर्गाची आराधना केली होती. युद्धात विजय आणि शक्ती मिळावी म्हणून त्यांनी देवीकडे प्रार्थना केली.

  • Que: रावणानेही देवी दुर्गेची पूजा केली होती का?

    Ans: होय, रावण हा देवीचा मोठा भक्त मानला जातो. त्याने कठोर तपश्चर्या करून देवीची आराधना केली होती, असे पौराणिक कथांमध्ये सांगितले जाते.

  • Que: नवरात्रीशी या कथेला काय संबंध आहे?

    Ans: नवरात्री हा देवी दुर्गेच्या पूजेचा सण आहे. त्यामुळे महाभारतातील अर्जुनाची दुर्गा पूजा ही कथा नवरात्रीच्या भक्तीभावाशी जोडली जाते.

Web Title: Mahabharat navratri story along with ravana this pandava also worshipped goddess durga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Mahabharat facts
  • mahabharat katha

संबंधित बातम्या

Mahabharata: महाभारतात युद्धापूर्वी शंखनाद का केला जात होता? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारणे
1

Mahabharata: महाभारतात युद्धापूर्वी शंखनाद का केला जात होता? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारणे

Mahabharata: रणनीती आणि प्रेमाचा संगम: अर्जुन–सुभद्रा विवाहाची अनोखी कथा, जाणून घ्या
2

Mahabharata: रणनीती आणि प्रेमाचा संगम: अर्जुन–सुभद्रा विवाहाची अनोखी कथा, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.