फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये नवसंवत्सर म्हणजेच हिंदू नववर्ष खूप विशेष आणि महत्वपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार दरवर्षी चैत्र महिन्यांच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. यावर्षी गुरुवार 19 मार्च रोजी हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. या दिवशी गुरुवार असल्याने नववर्षांचा राजा गुरु बृहस्पती मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या दिवशी नववर्षाची सुरुवात होते तो दिवस त्या ग्रहाचा असतो. तो राजा मानला जातो. या नववर्षाचे मंत्री मंगळ मानले जाते. हिंदू नववर्षाच्या दिवशी गुढीपाडव्याच्या सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ह्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यादिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्थान केले जाते, पूजा अर्चना केली जाते. जाणून घ्या नववर्षाला कडुलिंबाची पाने का खातात.
हिंदू नववर्षाच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. खास करून महाराष्ट्रात गुढीपाडवा, आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये उगादीच्या वेळी लोक कडुलिंबाच्या पानांचे सेवन करतात. काही ठिकाणी कडुलिंबाची पानं गुळ, चिंच आणि कैरी मिळून खातात. हार्दिक श्रद्धेनुसार, नववर्षाला कडूलिंबाची पाने खाण्याची परंपरा जीवनामध्ये गोड आणि कडू अनुभवांचे प्रतीक मानले जाते.
हे खाऊन असं संदेश दिला जातो की, येणारे नवीन वर्ष सुखदुःख, यश आणि अपेक्षांनी भरलेले असते. आपल्याला प्रत्येक परिस्थितीत तयार राहायला हवे. याशिवाय या परंपरेचा संबंध आरोग्याशी संबंधित आहे. हिंदू नववर्ष वसंत ऋतूमध्ये येते. यावेळी वातावरणामध्ये बदल होतो. अशावेळी संक्रमण आणि ॲलर्जीची समस्या वाढते. कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने शरीर शुद्ध राहते. यामुळे व्यक्ती आजारांपासून दूर राहते.
हिंदू नववर्षाच्या दिवशी सकाळी लवकर उठणे, स्नान करणे आणि देवतांची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी गणपतीची पूजा करणे ही देखील एक लोकप्रिय परंपरा आहे. गरजूंना दान करणे आणि घरात स्वच्छता राखणे देखील सकारात्मक मानले जाते. अनेक ठिकाणी चैत्र नवरात्राची सुरुवात या दिवसापासून होते म्हणून दुर्गा देवीची पूजा आणि घटस्थापना देखील केली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: या दिवशी कडुलिंबाची पाने गुळ किंवा साखरेसोबत खाण्याची परंपरा आहे. जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात याचे प्रतीक म्हणून ही प्रथा पाळली जाते.
Ans: हिंदू धर्मात कडुलिंबाला पवित्र आणि औषधी वृक्ष मानले जाते. नववर्षाच्या दिवशी कडुलिंबाचे सेवन केल्याने शरीर शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते.
Ans: कडुलिंबाची कडू चव आणि गुळाची गोड चव जीवनातील सुख-दुःखाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे नववर्षाची सुरुवात संतुलित भावनेने करण्याचा संदेश यातून मिळतो.






