महादेवाचे त्रिशूळ शिवलिंगासह का दिसत नाही (फोटो सौजन्य - iStock)
महाशिवरात्रीचा सण प्रत्येक शिवभक्तासाठी विशेष महत्त्वाचा आहे. भगवान शिव यांना समर्पित या उत्सवात शिवलिंगाची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. आज आपण शिवलिंग आणि शिव मंदिराशी संबंधित एक मनोरंजक गोष्ट जाणून घेऊया. खरंतर, जेव्हा तुम्ही शिवालयात किंवा शिवमंदिरात जाता किंवा शिवलिंग घरी आणता तेव्हा तुम्हाला एक विचित्र गोष्ट लक्षात आली असेल शिवलिंगासोबत किंवा बहुतेक शिवमंदिरांमध्ये त्रिशूळ नसतो. शिवाची सर्वात जवळची गोष्ट आणि भगवान शंकराची ओळख असणारी महत्त्वाची गोष्ट त्रिशूळ हे कधीच शिवलिंगसह नसते. असे का त्याचे नक्की काय रहस्य आहे याबाबत अधिक स्पष्टपणे आपण जाणून घेऊया
शिवाच्या त्रिशूळाबाबत माहिती
तुम्ही जेव्हा भगवान शंकराच्या मंदिरात जाता जिथे शिवलिंग आहे, तिथे नेहमीच तुम्ही पाहिलं असेल की शिवलिंगावर असणाऱ्या कलशातून शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक होत असतो आणि त्यावर नागछत्र दिसत आहे. शिवलिंगासोबत संपूर्ण शिव परिवार म्हणजेच माँ पार्वती, भगवान कार्तिकेय, अशोकसुंदरी आणि गणेशजी देखील दिसतात, पण शिवलिंगासोबत शिवाचे शस्त्र त्रिशूळ का दिसत नाही? हे असं का आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
धार्मिक श्रद्धेनुसार, त्रिशूळ आणि शिवलिंग हे दोन्ही महादेवाचे प्रतीक आहेत परंतु त्यांची ऊर्जा आणि महत्त्व वेगळे आहे. त्रिशूळ हे विनाश आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. दुसरीकडे, निर्मिती आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाची ऊर्जा त्रिशूळापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. अशा परिस्थितीत, या दोन वेगवेगळ्या शक्तींमध्ये टक्कर होऊ शकते; म्हणून या दोन्ही कधीच शिवलिंगाच्या ठिकाणी एकत्र ठेवल्या जात नाहीत
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर चुकूनही वाहू नका 5 गोष्टी, येऊ शकतात संकटं
त्रिशूळ न ठेवण्याचे कारण
शिवलिंगासोबत त्रिशूळ न ठेवण्यामागील कारण म्हणजे त्रिशूळ भगवान शिवाच्या भौतिक स्वरूपाशी संबंधित आहे परंतु शिवलिंग हे भगवानांच्या आध्यात्मिक आणि निराकार स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते. जर त्रिशूळ भगवान शिवाच्या मूर्तीसोबत दिसला तर ते भगवानाचे तीन मुख्य गुण दर्शवते आणि ते म्हणजे सत्य, ज्ञान आणि अनासक्ती जे शिवाच्या संपूर्ण अस्तित्वाचे प्रतीक म्हणून पाहिले जातात. त्रिशूळाचे तीन टोक विश्वाच्या तीन मुख्य पैलूंचे प्रतिनिधित्व करतात जसे की निर्माता, म्हणजेच ब्रह्मा, पालनकर्ता, म्हणजेच भगवान विष्णू आणि संहारकर्ता, म्हणजेच महेश. म्हणूनच हे शिवलिंगसह दिसत नाही
3 शूळ कशाचे प्रतीक
शिवलिंग हे भगवान शिवाचे निराकार रूप दर्शवते जे विश्वाच्या उर्जेचे आणि निसर्गाचे मिलन दर्शवते. त्रिशूळ हे भगवान शिवाच्या तीन पैलूंचे प्रतिनिधित्व करते ते म्हणजे निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता. यामुळेच त्रिशूळाकडे महादेवाच्या शक्ती आणि नियंत्रणाचे प्रतिनिधित्व म्हणून पाहिले जाते.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.