Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : दिवाळीच्या फराळातून जुळले माणुसकीचे नाते; जिल्हाधिकाऱ्यांची पारधी वस्तीला भेट

Dharashiv News : दिवाळीनिमित्त धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पानगाव येथील पारधी वस्तीला भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. निवारा, पाणी आणि रोजगाराचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. Focus Keyword

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 11, 2026 | 06:12 PM
Dharashiv News : दिवाळीच्या फराळातून जुळले माणुसकीचे नाते; जिल्हाधिकाऱ्यांची पारधी वस्तीला भेट

Dharashiv News : दिवाळीच्या फराळातून जुळले माणुसकीचे नाते; जिल्हाधिकाऱ्यांची पारधी वस्तीला भेट

Follow Us
Follow Us:
  • पानगाव येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या
  • निवारा, पाणी आणि रोजगाराचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही
  • चिमुकल्यांशी संवाद; शिक्षणाचा दिला संदेश
 

Dharashiv News :  दिवाळीच्या आनंदात समाजातील वंचित घटकांसोबत आनंद वाटून घेत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कळंब तालुक्यातील पानगाव येथील पारधी वस्तीला भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हक्काची जागा, पिण्याचे पाणी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर प्राधान्याने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. तसेच लहान मुलांशी संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

जिल्हाधिकारी पुजार यांनी 9 नोव्हेंबर रोजी रात्री पानगाव येथील पारधी वस्तीला भेट दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थित होते. वस्तीवरील नागरिकांच्या राहणीमानाची, उपजीविकेची आणि दैनंदिन अडचणींची माहिती घेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

पारधी बांधव अनेक पिढ्यांपासून या ठिकाणी वास्तव्यास असले, तरी त्यांना अद्याप हक्काची जागा मिळालेली नाही. तसेच सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वस्तीवरील अनेक कुटुंबे फटाका कारखान्यात आणि शेतांमध्ये मजुरी करून उदरनिर्वाह करतात. मात्र, कायमस्वरूपी रोजगाराची साधने उपलब्ध नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या सर्व प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करून तातडीने निवारण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

चिमुकल्यांशी संवाद; शिक्षणाचा दिला संदेश

भेटीदरम्यान जिल्हाधिकारी पुजार यांनी वस्तीवरील लहान मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रत्येक मुलाने नियमित शाळेत जाऊन शिक्षण घ्यावे, पालकांनीही मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणामुळे मुलांच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते, त्यामुळे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, असे त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी शासकीय आश्रमशाळांमधील मोफत शिक्षण, निवास आणि आरोग्य सुविधांची माहिती देत पालकांना मार्गदर्शन केले.

Wardha News: कारंजातील अचानक डायलिसिस केंद्र बंद! निधीअभावी मोफत सेवा ठप्प; रुग्णांच्या अडचणीत भर

दिवाळीचा फराळ अन् माणुसकीचा गोडवा

दिवाळीनिमित्त प्रशासनाच्या वतीने वस्तीवरील नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले, तर चिमुकल्यांना फटाके देण्यात आले. यावेळी पारधी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आपुलकीने समस्या ऐकून घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करत स्वतःकडील खाऊ त्यांना प्रेमाने दिला. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत खाऊ खाल्ला.

प्रशासन आणि वंचित समाजातील घटकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणारा हा प्रसंग उपस्थितांसाठी भावनिक ठरला. केवळ शासकीय कार्यालयातून नव्हे, तर थेट वस्तीवर जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, या भेटीतून प्रशासनाचा लोकाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित झाला. दिवाळीच्या प्रकाशपर्वात पानगावच्या पारधी वस्तीवर माणुसकी आणि आशेचा नवा दिवा उजळला.

एका अक्षराच्या चुकीमुळे ‘या’ गावातील शेतकरी दिवाळी मदतीपासून वंचित; प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या वस्तीला भेट दिली?

    Ans: जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कळंब तालुक्यातील पानगाव येथील पारधी वस्तीला भेट दिली.

  • Que: जिल्हाधिकाऱ्यांनी पारधी वस्तीला भेट कधी दिली?

    Ans: 9 नोव्हेंबर रोजी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी पारधी वस्तीला भेट दिली.

  • Que: पारधी वस्तीवरील नागरिकांच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत?

    Ans: हक्काची जागा, पिण्याचे पाणी आणि कायमस्वरूपी रोजगार या नागरिकांच्या प्रमुख समस्या आहेत.

Web Title: Dharashiv news collector paradhi vasti visit diwali faral rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali food
  • drought news

संबंधित बातम्या

Bhaubij 2026 : भाऊबीजेला भावाला नारळ आणि करगोटा का देतात? जाणून घ्या खास कारण
1

Bhaubij 2026 : भाऊबीजेला भावाला नारळ आणि करगोटा का देतात? जाणून घ्या खास कारण

Diwali Food: दिवाळीत तळलेलं खाल्ल्यामुळे पोटात गॅस आणि Acidity चा त्रास होतोय का, जाणून घ्या सोपे उपाय
2

Diwali Food: दिवाळीत तळलेलं खाल्ल्यामुळे पोटात गॅस आणि Acidity चा त्रास होतोय का, जाणून घ्या सोपे उपाय

Bhaubeej 2026: सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया..! भाऊबीजेनिमित्त लाडक्या भावाला द्या ‘या’ खास शुभेच्छा
3

Bhaubeej 2026: सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया..! भाऊबीजेनिमित्त लाडक्या भावाला द्या ‘या’ खास शुभेच्छा

Ashish Shelar : दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांच्या अडचणी अन् आशिष शेलार थेट बांधावर; आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
4

Ashish Shelar : दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांच्या अडचणी अन् आशिष शेलार थेट बांधावर; आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.