
फोटो सौजन्य- pinterest
मुंबई ठाण्याहून कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने लोकलने प्रवास करत असताना मुंब्रा रेल्वे स्थानक येताच नजर जाते, ती लोकलमधून दिसणाऱ्या भल्या मोठ्या डोंगरावर आणि या डोंगरात वसलेल्या आई मुंब्रा देवीच्या मंदिरावर आणि आपसूकच आपले हात नतमस्तक होतात. रेल्वेतूनही असंख्य प्रवासी देवीला मनोभावे नमस्कार करतात. सह्याद्री किनारपट्टीच्या डोंगराळ भागातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या 300 ते 350 वर्षांपूर्वीच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील पुस्तकात उल्लेख असलेल्या आई मुंब्रा देवीचा काय आहे इतिहास, जाणून घ्या
मुंब्रा देवी मंदिराच्या निर्माणाची ही एक ऐतिहासिक कथा नाही तर, अलीकडचीच वास्तविकता आहे. डोंगर कपारीत असलेल्या या मुंब्रा देवीचे रस्त्यावरून जाणारे, लोकल ट्रेनमधून प्रवास करणारे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेऊनच पुढील प्रवास करत असल्याची एक परंपरा आणि संस्कृती आहे. मुंब्रा देवीचे मंदिर हे जरी डोंगरात असले तरीही भाविक दर मंगळवारी आणि इतर दिवशीही या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पोहोचण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो.
मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरल्यावर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर आणि मुंब्रा बायपासवर अगदी रस्त्यालगत हे मंदिर लागते. या मंदिराला एकूण ७५० पायऱ्या आहेत आणि या खडतर पायऱ्यांचा प्रवास करत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पोहोचण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. मंदिर प्रवेशद्वाराच्या काही पायऱ्या सर केल्यानंतर सर्वात आधी लागते मारुती आणि साती आसरा देवीचे मंदिर. आधी या मंदिरात दर्शन करूनच भाविक पुढील प्रवासाला सुरुवात करतात. मंदिरात जाताना डोंगराच्या मध्यभागी पोहोचताच डोंगरावरून नजरेस पडतो तो संपूर्ण खाडी किनारा व संपूर्ण मुंब्रा, दिवा, डोंबिवली शहराचा परिसर आणि या ठिकाणी पोहोचताच भाविकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. निसर्गचे नयनरम्य दृश्य पाहून अनेक भाविकांचा येथून पाय निघत नाही.
७५० पायऱ्या चढून वर आल्यानंतर लागतो तो मंदिराचा मुख्य गाभारा आणि गाभाऱ्यात आल्यावर दर्शन होत ते आई मुंब्रा देवीचे. महाराष्ट्रातील असे हे पहिले मंदिर आहे ज्यात नऊ दुर्गांचे दर्शन होते. नवरात्रीदरम्यान या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आई मुंब्रा देवीचे मंदिर देखील कोरोनाकाळात गेली दीड वर्षे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.
नाना भगत यांचे कुटुंबिय गेल्या १०० वर्षांपासून देवीची सेवा करत आहेत. नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो. नऊ दिवस देवीला विविध सोहळे परिधान करतात. पूजाअर्चा चालते. ही स्वयंभू देवी असून जागृत देवस्थान आहे.
मुंब्रा हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. ठाण्याच्या जवळ असलेले हे ठिकाण मुंबईपासून ४० कि.मी. अंतरावर आहे. मुंब्र्यात खाडी असल्याने मोगल काळात कल्याणच्या किल्ल्याची राखण करणारी चौकी म्हणून वसलेल्या या गावात 17व्या शतकात जहाजबांधणीचा उद्योग भरभराटीस आला. आगरी – कोळी यांची देवता मुंब्रा देवीच्या नावावरून गावाचे नाव मुंब्रा ठेवण्यात आले. मंदिराचे बांधकाम मुंब्रा येथील भगत कुटुंबाने केले असून ते अजूनही शहरातच राहतात. १७ व्या शतकाच्या दरम्यान मुंब्रा हे आगरी – कोळीचे एक लहान गाव होते. त्यांचा मुख्य व्यवसाय हा मच्छिमारी होता. १९६८ ते १९७५ च्या दरम्यान नोकरीसाठी मुंबईला येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आणि लोकांनी मुंबईच्या जवळ वसाहत स्थापन करायला सुरुवात केली. त्याचवेळी मुंब्र्याच्या शेतजमिनीचे शहरीकरण झाले आणि लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: स्थानिक कथेनुसार, देवीने या परिसराचे रक्षण केले आणि गावकऱ्यांना संकटांपासून वाचवले, त्यामुळे त्यांची पूजा सुरू झाली.
Ans: आगरी-कोळी समाजासाठी मुंब्रा देवी अत्यंत श्रद्धास्थान आहे.
Ans: देवीची पूजा केल्याने संरक्षण, समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.