फोटो सौजन्य- pinterest
नागपंचमीचा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो. पंचांगानुसार, हा सण आज मंगळवार, 29 जूलै रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी नागदेवतेची पूजा केली जाते. तसेच नागाला दूध देखील अर्पण केले जाते. व्यक्तीला जीवनामध्ये सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि भीतीपासून मुक्तता मिळते, अशी यामागे श्रद्धा आहे. नागपंचमीचा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही तर तो निसर्ग आणि प्राण्यांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम देखील आहे.
नागपंचमीच्या दिवशी अनेक परंपरा पाळल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे नागपंचमीच्या दिवशी लोखंडी वस्तू वापरू नयेत. यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक कारण आहे. यामुळे फक्त पूजेचे पावित्र्य राखत नाही तर सर्प देवतांना प्रसन्न करण्याच्या आणि आशीर्वाद देण्याच्या इच्छेशी देखील जोडलेले आहे. नागपंचमीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू का वापरत नाही, जाणून घ्या
हिंदू धर्मामध्ये नागपंचमीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू वापरल्या जात नाही. विशेषतः तवा, चाकू, कात्री आणि लोखंडी भांडी. यामागे धार्मिक, ज्योतिषीय आणि सांस्कृतिक कारणे आहेत. या दिवसाचे पावित्र्य राखण्यासाठी ही कारणे महत्त्वाची मानली जातात.
लोखंडाच्या वस्तू या राहू ग्रहाचे प्रतीक मानले जाते. राहू ग्रह एक छाया ग्रह असल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये अशांतता, आजार आणि अडथळे आणू शकतो. या दिवशी लोखंडी तवा किंवा इतर वस्तूंच्या वापरामुळे वाढू शकते. ज्याचा परिणाम व्यक्तीच्या कुंडलीमध्ये होऊ शकतो. कालसर्प योग किंवा राहू दोष सारख्या समस्या उद्भवू शकतात. राहू ग्रहाला सापाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या जीवनात अडथळे येऊ शकतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, लोखंडाचा संबंध शनि आणि राहू या ग्रहांशी आहे. जेव्हा राहू शनिच्या प्रभावाखाली असतो त्यावेळी व्यक्तीला मानसिक ताण, अपयश आणि कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये तणाव आणू शकतो. म्हणूनच, नागपंचमीसारख्या पवित्र दिवशी लोखंडापासून दूर राहणे शुभ मानले जाते जेणेकरून शांती टिकून राहील.
नागपंचमीच्या दिवशी जर चुकून लोखंडाचा वापर केल्यास ताबडतोब नाग देवतेची क्षमा मागावी. यासोबतच संध्याकाळी नाग स्तोत्र किंवा “ओम नम: नागदेवताय” या मंत्राचा जप केल्याने देखील दोष दूर होतो, असे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)