फोटो सौजन्य- pinterest
महादेवाचा आवडता महिना श्रावण. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो. यावेळी नागपंचमीचा सण मंगळवार, 29 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये सापांना देवतेचा दर्जा देण्यात आलेला आहे. लोकांना सापांची भीती वाटत असली तरी, वर्षात एक दिवस असा असतो जेव्हा सापांना घाबरण्याऐवजी त्यांची पूजा विधीपूर्वक केली जाते. असे देखील म्हटले जाते, नागपंचमीच्या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्यास कालसर्प दोष दूर होतो. त्याचसोबत अशुभ ग्रहांचे परिणाम देखील दूर होतात. नागपंचमीच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय करायचे जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक करावा. या दिवशी रुद्राभिषेक केल्याने तुम्हाला अधिक फायदे होतील.
वृषभ राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी चांदीचा तुकडा घेऊन तो वाहत्या पाण्यात तरंगवावा. असे केल्याने तुम्हाला लाभ होऊ शकतो.
मिथुन राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी गरजूंना मूग डाळ दान करावी. यावेळी महादेवांची पूजा करणे चांगले फळ मिळते.
कर्क राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये नारळ सोडावा. त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा. त्यामुळे तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतात.
सिंह राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी गरजूंना नारळाचे दान करावे. तसेच शिवलिंगावर जलाभिषेक करावा. असे करणे फायदेशीर राहील.
कन्या राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी महादेवांना जलाभिषेक करावा. तसेच आजारी असलेल्या व्यक्तीची सेवा करावी. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते.
तूळ राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिव चालिसेचे पठण करावे. त्यानंतर गरजूंना जेवण आणि कपडे दान करावे. हे करणे फायदेशीर ठरते.
वृश्चिक राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी महादेव आणि गणपतीची पूजा करावी. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगांचे लाडू आणि फुले अर्पण करावीत त्यामुळे मानसिक शांती मिळते.
धनु राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी शिवाला पीठ आणि साखरेच्या मिश्रणापासून बनवलेल्या मिठाई अर्पण कराव्यात. त्यानंतर ती मिठाई सर्वांना प्रसाद म्हणून वाटावी. यामुळे पापांचा नाश होतो, असे म्हटले जाते.
मकर राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी महादेवांना काळे तीळ अर्पण करावेत. तसेच गरजूंना अन्नदान देखील करावे.
कुंभ राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्यानंतर ‘ओम नागदेवताय नम:’ या मंत्रांचा जप करावा. त्यामुळे कालसर्प दोष दूर होतो.
मीन राशीच्या लोकांनी नागपंचमीच्या दिवशी महादेवाचा रुद्राभिषेक करावा. तसेच ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)