फोटो सौजन्य- istock
ग्रहांचे राशी आणि नक्षत्रातील बदल काही राशीच्या लोकांसाठी शुभ असते. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. पण उद्या म्हणजेच 29 जुलै रोजी नागपंचमी देखील आहे या दिवशी तो आपली हालचाल बदलणार आहे. बुध दर 15 ते 20 दिवसांनी आपले नक्षत्र बदलतो. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानले जाते. बुध ग्रह हा व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बलवान असला तरी व्यक्तीला व्यवसायात अपेक्षित यश मिळते. तसेच एखाद्या कार्यातही अपेक्षित यश मिळते. जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह कमकुवत असल्यास त्या व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
ज्यावेळी सूर्य ग्रह एखादी राशी किंवा नक्षत्र बदलत असतो त्यावेळी त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. बुध दर 15 ते 20 दिवसांनी आपले नक्षत्र बदलतो. बुध ग्रहाचे हे नक्षत्र परिवर्तन दुपारी 4.17 वाजता होणार आहे. या काळात बुध कर्क राशीमध्ये राहून पुष्य नक्षत्रात संक्रमण करेल. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनि आहे. याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. बुध ग्रहाच्या नक्षत्र बदलांचा कोणत्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
बुध राशीचे हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. बुध ग्रह हा धन, वाणी आणि कुटुंबाशी संबंधित आहे. बुध हा मिथुन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या लोकांना व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जातून सुटका होईल. एखाद्या कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित यश मिळेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र सकारात्मक परिणाम होतील. सिंह राशीच्या लोकांना या काळात विशेष लाभ होतील. या नक्षत्र संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना परदेशात नोकरी करण्याची संधी मिळू शकते. या काळामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ आणि कर्जातून मुक्तता मिळेल.
कन्या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे त्याचे हे नक्षत्र संक्रमण फायदेशीर असणार आहे. पुष्य नक्षत्राच्या प्रभावामुळे तुमची बौद्धिक क्षमता आणखी वाढेल. तसेच तुम्ही तुमचे ध्येय साध्य करु शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.
तूळ राशीच्या लोकांना बुध ग्रहांचे नक्षत्र हे संक्रमण फायदेशीर राहील. बुध ग्रहांचे हे संक्रमण करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित आहे. पुष्य नक्षत्राची सात्विक ऊर्जा तूळ राशीच्या लोकांना व्यावसायिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. जे लोक व्यवसायात भागीदारीमध्ये काम करत आहे त्यांना अपेक्षित लाभ मिळेल.
बुध ग्रहाच्या नक्षत्र संक्रमणाचा परिणाम धनु राशीच्या लोकांवर शुभ परिणाम होईल. हे संक्रमण घर नशीब, उच्च शिक्षण आणि अध्यात्माशी संबंधित आहे. पुष्य नक्षत्राचा प्रभावामुळे या राशीच्या लोकांवर आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रभाव पडेल. विद्यार्थ्यांना या काळामध्ये अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)