
असं म्हणतात की, मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा अत्यंत गुढ आहे. पुराणकथेनुसार, एकदा महादेव देवी पार्वतीला अमरत्व आणि योगविद्येचे गुप्त ज्ञान सांगत होते. हे ज्ञान कुणालाही ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी निर्जन समुद्रकिनाऱ्यावर हे उपदेश दिले. मात्र त्या वेळी जवळच एका माशाच्या पोटात असलेला एक बालक हा संपूर्ण संवाद ऐकत होता.शिव-पार्वतीचा संवाद ऐकून त्या बालकाला योगविद्येचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले. नंतर तो मासा एका मच्छीमाराच्या जाळ्यात सापडला. त्या माशाच्या पोटातून एक बालक जिवंत बाहेर आले. त्यामुळे याा बालकाला “मत्स्येंद्र ” असं नाव पडलं. या बालकाने पुढे योग, तंत्र आणि अध्यात्म यांचा प्रसार केला. तेव्हा मत्स्येंद्र हा बालक पुढे मच्छिंद्रनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले. मच्छिंद्रनाथांनी अनेक शिष्य घडवले, त्यात गोरखनाथ हे सर्वात पहिले शिष्य होते. नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथांना आद्य गुरु मानले जाते.महाराष्ट्रासह नेपाळमध्येही मच्छिंद्रनाथांची श्रद्धेने पूजा केली जाते. नेपाळमधील ललितपूर येथे त्यांचा भव्य रथोत्सव साजरा केला जातो. तर अशी होती मच्छिंद्रनाथांच्या जन्माची गोष्ट.
हिंदू धर्मातील आख्य़ायिकेनुसार, दत्तगुरु हे त्रिदेवांचे म्हणजेच ब्रह्मा, विष्णु, महेश यांचा अंश आहेत. तीनही देवांच एकत्रित तत्त्व दत्तगुरुंमध्ये आहे. त्यांनी अध्यात्मिक मार्गाने मानवी जीवनाला योग्य दिशा दाखवण्यासाठी विविध रूपं घेतली. नवनाथ हे त्या दत्ततत्त्वाचा एक भाग आहेत.“नवनाथ” म्हणजे नऊ नाथ. गुरू किंवा आध्यात्मिक दोन्ही तत्वांवर नवनाथ संप्रदायाची परंपरा आधारित आहे. या नवनाथांचा संबंध नाथ संप्रदायाशी आहे, जो योग, तंत्र, साधना यांचा समन्वय असलेली परंपरा आहे. परंपरेनुसार, या नवनाथांचे आद्य गुरु म्हणजे दत्तात्रेय ज्यांना त्रिदेव (ब्रह्मा, विष्णु, महेश) यांच्या एक स्वरूपाचे अवतार मानले जाते.