Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navnath Gatha : नदीच्या किनारी अवतरला दिव्य बालक, ‘असा’ झाला रेवणनाथाांचा जन्म

नवनाथांपैकी एक म्हणजे रेवणनाथ. त्यांच्या जन्माची आणि नावाची कथा रहस्यमय आहे. चला तर मग जाणून घेऊयात कसा झाला रेवणनाथांचा जन्म.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 16, 2026 | 12:37 PM
Navnath Gatha : नदीच्या किनारी अवतरला दिव्य बालक, ‘असा’ झाला रेवणनाथाांचा जन्म
Follow Us
Close
Follow Us:
  • नदीच्या किनारी अवतरला दिव्य बालक
  • कसा झाला रेवणनाथाांचा जन्म ?
  • श्री दत्तात्रयांची योजना
  • महिमा सिद्धीचा दृष्टांत
नवनाथांपैकी एक म्हणजे रेवणनाथ. त्यांच्या जन्माची आणि नावाची कथा रहस्यमय आहे. चला तर मग जाणून घेऊयात कसा झाला रेवणनाथांचा जन्म. रेवणनाथ म्हणजे आदीनाथ भगवान महादेवांचा अंश म्हटलं जातं. या रेवणनाथांचा जन्म हा नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठीच झालेला होता. तर गोष्ट अशी की, सहन सारुख या नांवाचा एक शेतकरी पाणी आणायला म्हणून नदीवर गेला. त्याला नदीकिनारी एक बाळ दिसलं. रडणाऱ्या बाळाला पाहून सहन सारुखला दया आली. त्याने मायेने या बाळाला जवळ घेतलं. सहन साारुख बाळाला घेऊन घरी आला. त्याने पत्नीला सर्व हकीकत सांगितली. नर्मदेच्या किनारी रेतीत या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सहन सारुख जे काही सांगत होता ते त्याची पत्नी नेटाने ऐकत होती. केवळ थोड्या वेळाच्या सहवासातच तिला या बाळाला लळा लागला.

सहन सारुखच्या पत्नीने या बाळाला अंघोळ घातली. हे बाळ सहनसारुखला नर्मदानदी किनारी सापडलं. त्याची पत्नी म्हणाली की, हे बाळ नर्मदेच्या किनारी सापडलं. नर्मदेला पुराणकथांमध्ये रेवा असं नाव आहे. त्यामुळे रेवाकिनारी रेतीत सापडलेला बालक म्हणून रेवण असं या बाळाच नाव ठेवण्यात आलं. सहन सारुख आणि त्याच्या पत्नीने या बाळाचं पालकत्व स्विकारलं. सहन सारुख शेतकरी असल्यामुळे वयात आल्यावर रेवण देखील वडिलांबरोबर शेतीची कामं करायला जात असायचा.

 

Navnath Gatha : गायीच्या शेणातून जन्माला दिव्य योगी ; नाथसंप्रदायातील गोरखनाथांच्या जन्माची अद्भुत गोष्ट

नदीच्या किनारी अवतरला दिव्य बालक

एकदा रेवण शेतात जात होता. हा तोच रस्ता होता जिथून श्रीदत्तगुरु गिरनार पर्वाताकडे मार्गक्रमण करत होते. त्यांना वाटेत रेवण दिसला. दत्तगुरुंनी या बालकाला ओळखलं. रेवणला दत्तगुरुंनी महिमा सिद्धीचा मंत्र दिला. रेवण शेतात काम करत असताना त्या मंत्राचा जप करीत असे. त्यामुळे झालं असं की, रेवणला सिद्धी प्राप्त झाली. रेवणने वर मागितला की, माझ्या कुटुंबाच दारिद्र्य दूर व्हावं. रेवणची ही प्रार्थना फळाला आली. सहससुख आणि त्याच्या पत्नीला सुखाचे दिवस मिळाले. असं म्हटलं जातं की, रेवण हा महादेवांचा अंश होता. लहानपणापासूनच रेवणला अध्यात्माची ओढ होती. रेवणचा जन्म हा देखील दैवी संकेत होता. जसं वय वाढलं तसं दत्तगुरुंच्या योजनेप्रमाणे रेवणला नाथसंप्रदायाचं मार्गदर्शन लाभलं आणि दत्तगुरुंच्याच आशिर्वादाने लोककल्य़ाणासाठी रेवण नाथ संप्रदायाशी जोडला गेला. आणि त्यामुळेच रेवण हा बालक पुढे रेवणनाथ या नावाने ओळखले जाऊ लागले.

Navnath Gatha : माशाच्या गर्भातून जन्मला तेजस्वी बालक, मच्छिंद्रनाथांच्या जन्माचं रहस्य

 

Web Title: Navnath gatha a divine child was born on the banks of the narmada river how was revannath born

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 12:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.