फोटो सौजन्य: गुगल
View this post on Instagram
A post shared by नवराष्ट्र Lifestyle (@navarashtra_lifestyle)
जाहिरातजाहिरात
बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ पुन्हा त्या ठिकाणी आले आणि त्या स्त्रीला विचारले की, तुझा मुलगा कुठे आहे? तेव्हा सरस्वतीने सांगितलं की मला मुलगा झालाच नाही. त्यावर नाथ चिडले. ते म्हणाले तू खोट बोेलतेस. नाथांचा चिडलेला चेहरा पाहून सरस्वतीबाई घाबरली आणि तिने घडलेला सगळा प्रकार नाथांच्या कानावर घातला. त्यानंतर नाथ गायीच्या गोठ्यात गेले.
गायीच्या गोठ्यात गेल्यावर नाथ म्हणाले की, हे सूर्यसूता तू कुठे आहेस ? जर तू या शेणाच्या ढिगाऱ्यात असशील तर माझ्या हाकेला प्रतिसाद दे. त्यावर आवाज आला की, गुरुवर्य मी इथेच आहे शेणाच्या ढिगाऱ्याखाली अडकलो आहे तुम्ही मला बाहेर काढा. मच्छिंद्रनाथांनी शेण बाजूला सारलं आणि त्या ढिगाऱ्यातून एक तेजस्वी बालक बाहेर आला. शेण म्हणजे गोबर आणि त्यातून जन्मलेला हा योगी पुढे गोरखनाथ म्हणून ओळखला जाऊ लागला. गोरखनाथ यांनी नाथ संप्रदायाचा प्रसार भारतभर केला. योग, साधना, हठयोग आणि अध्यात्म यांचा प्रचार करून त्यांनी अनेक शिष्य घडवले. त्यांचे नाव गोरखपूर या शहराशीही जोडले जाते, कारण तेथे त्यांचे प्रसिद्ध मंदिर आहे.नाथ संप्रदायात गोरखनाथांना महान योगी आणि सिद्ध पुरुष मानले जाते. त्यांच्या अध्यात्मिक प्रवासावर कथा, परंपरा आणि धार्मिक श्रद्धा आजही प्रचलित आहेत.






