फोटो सौजन्य- pinterest
शारदीय नवरात्रीची सुरुवात लवकरच होणार आहे. यावेळी देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाणार आहे. असे म्हटले जाते की, या काळात ज्यांना नऊ दिवस उपवास करायला जमत नाही त्यांनी देवीची विधिपूर्वक पूजा करावी. त्यामुळे व्यक्तीला जीवनामध्ये कधीही जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत नाही. देवी दुर्गा नेहमी आपले संरक्षण करते, असे म्हटले जाते.
यावेळी नवरात्र 9 दिवस नसून 10 दिवस राहील. अष्टमी आणि नवमी कधी आहे ते जाणून घ्या
ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, सोमवार 22 सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होत आहे. तर 1 ऑक्टोबर रोजी महानवमी आणि 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीच्या दिवशी देवी दुर्गेच्या कलशाची स्थापना केली जाते. या दिवसांपासून नवरात्रीची सुरुवात होते. नवरात्रीमध्ये देवीच्या पूजेला जेवढे महत्त्व आहे तेवढे अष्टमीला सुद्धा महत्त्व आहे. या दिवशी कन्या पूजन देखील केले जाते. नवरात्रीमध्ये एक दुर्मिळ योगायोग तयार होणार आहे. 9 दिवस नाही तर 10 दिवस चालणारी ही नवरात्र खूप शुभ मानली जाते.
ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, घटस्थापना 22 सप्टेंबर रोजी आहे. यावेळी द्वितीया तिथी 23 सप्टेंबर रोजी आहे. तर तृतीया तिथी 23 आणि 24 तारखेला असल्यामुळे एक दिवस वाढला गेला आहे. त्यामुळे यावेळी नवरात्र 9ऐवजी 10 दिवस आली आहे.
यंदा नवरात्रीमध्ये एक दिवस जास्तीचा आल्याने लोकांच्या मनात अष्टमीबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे. यंदा अष्टमीचे व्रत मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी आहे, तर नवमी बुधवार, 1 ऑक्टोबर रोजी राहील. तसेच 2 ऑक्टोबर रोजी दसरा असल्याने या दिवशी देवीचे विसर्जन करुन नवरात्रीची समाप्ती होईल.
नवरात्रीत देवीची पूजा जितकी महत्त्वाची आहे, तितकीच महाअष्टमी व्रत आणि त्या दिवशी होणारे कन्या पूजनही तितकेच महत्त्वाचे आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, अष्टमीला नऊ मुलींची पूजा करणे आणि त्यांना जेवण घालणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानले जाते.
नवरात्रीमधील हे 10 दिवस खूप शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की, या काळात देवीच्य नऊ रुपांची नियमांने पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते. तसेच जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होतात आणि देवीचा तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद राहू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)