फोटो सौजन्य- pinterest
गुरुवार, 11 सप्टेंबरचा दिवस. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची पंचमी तिथी आहे म्हणजेच पितृपक्षातील पंचमी आणि भरणी आज आहे. चंद्र आज दिवसभर मेष राशीमध्ये संक्रमण करणार आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे वसुमान योग तयार होणार आहे. आज सूर्य स्वतःच्या राशीमध्ये असल्याने आदित्य योग देखील तयार होईल. त्यासोबतच अश्विनी आणि भरणी नक्षत्रामुळे ध्रुव आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होणार आहे. आज मेष, मिथुन, तूळ, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूर फायदेशीर राहणार आहे. व्यवसाय आणि करिअर इत्यादी गोष्टींध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. गुरुवारच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. करिअर आणि कामाच्या बाबतीत तुमचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला आर्थिक बाबतीत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही ज्या क्षेत्रात पूर्ण समर्पणाने काम करत त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि हुशारीने तुम्ही सर्वात कठीण कामे देखील पूर्ण करू शकाल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडूनही पाठिंबा मिळेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. तुम्ही नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकता. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि कार्यक्षमतेचा फायदा घेऊ शकाल. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल. तुमचे संपर्क वाढल्यास तुम्हाला अधिक फायदा होईल.
तूळ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. काही दिवसांपासून जीवनात काही चिंता आणि त्रास होत असल्यास त्या दूर होतील. नशीब तुम्हाला एकापेक्षा जास्त स्रोतांकडून फायदे देईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला कुटुंबासोबत मनोरंजक वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोणतेही नवीन काम देखील सुरू करू शकता.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा राहील. तुम्हाला व्यवसायात नफा कमावण्याची संधी मिळेल. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित फायदा मिळेल. जर तुम्ही भागीदारीत काही काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. वाहिक जीवन चांगले राहील.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. त्यासोबतच तुम्हाला नफा आणि आदर देखील मिळेल. तुमची कोणतीही अपूर्ण राहिलेली इच्छा आज पूर्ण होऊ शकते. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळतील. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणार असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)