फोटो सौजन्य- pinterest
गुरुवार, 11 सप्टेंबर रोजी कर्क राशीत शुक्र आणि मिथुन राशीमध्ये गुरु याने 30 अंशाचा ‘द्विद्वादश योग तयार केला आहे. ज्यावेळी एखादा ग्रह दुसऱ्या घरापासून बाराव्या घरात असेल त्यावेळी हा योग तयार होणार आहे. कर्क ही मिथुन राशीत असल्यामुळे त्याचा क्रमांक दुसरा राहील. गुरू शुक्रापासून बाराव्या क्रमांकावर असल्याने त्याचे मिश्रित परिणाम मिळतील.
शुक्र ग्रहाला आनंद, प्रेम, संपत्ती आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. तर गुरु ग्रहाला बुद्धी, समृद्धी आणि नशीबाचे प्रतीक मानले जाते. भावनिक आणि कौटुंबिक बाबींना बळकटी देतो, तर मिथुन राशीतील गुरू संवाद आणि बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देतो. या योगाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर वेगवेगळा राहील. त्यामुळे तुमच्यामधील आर्थिक स्थिरता, संबंध सुधारणे आणि आध्यात्मिक प्रगतीच्या संधी तुम्हाला मिळतील. दरम्यान काही राशीच्या लोकांना अनावश्यक खर्च आणि आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल. कोणत्या राशींना या लोकांचा फायदा होईल, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांना द्विद्वाद योगाचा सकारात्मक परिणाम होणार आहे. गुरु तुमच्या कुंडलीमध्ये तिसऱ्या भावावर परिणाम करणारा राहील. या काळात भावडांसोबत तुमचे नाते मजबूत राहील. या काळात तुम्हाला कौटुंबिक आनंद मिळेल. तसेच करिअरमध्ये नवीन सुरुवात करण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. तुमची नोकरी बदलण्याचा किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल राहील. आर्थिकदृष्ट्या हा काळ गुंतवणूक आणि व्यवसायात फायदा मिळविण्यासाठी खूप चांगला आहे.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर राहणार आहे. कारण शुक्र तुमच्या या राशीमध्ये राहणार आहे. तुमची स्वतःची प्रतिमा, आरोग्य आणि आत्मविश्वास वाढवेल. तुमच्या कुंडलीमध्ये गुरु बाराव्या घरात असल्याने खर्चामध्ये वाढ होऊ शकते. परदेश प्रवास किंवा आध्यात्मिक कार्यात गुंतवणूक यासारख्या सकारात्मक दिशेने तुम्ही प्रवास करु शकता. जर तुम्ही रिअल इस्टेट, गृहसजावट किंवा कौटुंबिक व्यवसायात गुंतलेले असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग चांगला राहणार आहे. यामुळे समृद्धी आणि सामाजिक सन्मान वाढेल. तुमच्या कुंडलीमध्ये बाराव्या घरात शुक्र असल्याने परकीय स्रोतांकडून संपत्ती किंवा अनपेक्षित लाभ मिळवू शकतो. या योगामुळे करिअरमध्ये प्रगती, सर्जनशील कार्यात यश आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा दर्शवू शकतो. मनोरंजन किंवा नेतृत्व भूमिकांमध्ये असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर राहणार आहे. कारण यावेळी गुरु तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि तुमच्या कुंडलीमध्ये सातव्या घरावर प्रभाव टाकेल. व्यवसाय, भागीदारी आणि वैवाहिक जीवन मजबूत करेल. आठव्या घरात शुक्र ग्रह असल्याने वारसा किंवा अनपेक्षित पैसे यासारखे रहस्यमय लाभ मिळू शकतात. शिक्षण, प्रवास किंवा आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्यांसाठी हा काळ प्रगतीचा राहील. व्यवसायातील व्यवहार आणि गुंतवणूक यशस्वी होतील. या काळामध्ये धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात.
मीन राशीच्या लोकांसाठी हा योग सामान्य राहणार आहे. या योगामध्ये घरगुती आणि सर्जनशील जीवनामध्ये सकारात्मक बदल होतील. तुमच्या राशीचा स्वामी गुरु ग्रह असल्याने चौथ्या घरात संक्रमण होईल. ज्याचा संबंध घरगुती आनंद आणि मालमत्तेशी संबंधित आहे. हा तुमच्या कुंडलीमध्ये पाचव्या घरात असल्याने मुले, सर्जनशीलता आणि प्रेमाला प्रोत्साहन देणारा राहील. शिक्षण, कला किंवा अध्यापन क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थैर्य स्थिर राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)