Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026 First Day: नवरात्रीची पहिली माळ चुकवू नका! देवी शैलपुत्रीची पूजा, आवडता नैवेद्य आणि शुभ रंग जाणून घ्या

Navratri 2026 First Day: शारदीय नवरात्रीला ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवी दुर्गेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. पर्वतराज हिमालयाची कन्या असल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 11, 2026 | 12:12 PM
Navratri 2026 First Day: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Navratri 2026 First Day: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पहिल्या माळेचे महत्त्व
  • शुभ रंग आणि नैवेद्य
  • घटस्थापना मुहूर्त आणि मंत्र
आपल्याकडे नवरात्रीला सणांमध्ये सगळ्यात वरचा मान आहे. वर्षभरात चार वेळा नवरात्री येते, पण अश्विन महिन्यात येणारी शारदीय नवरात्री हीच खरी मोठी नवरात्री मानली जाते. या नऊ दिवसांत आदिशक्तीची पूजा, उपवास, जागरण तसेच देवीचा जयजयकार केला जातो. यावेळी 2026 मध्ये शारदीय नवरात्री 11 ऑक्टोबर पासून सुरु झाली. Navratri 2026 First Day:

नऊ दिवस आदिशक्तीची पूजा, उपवास, जागरण आणि देवीचा जयजयकार होतो. यावेळी 2026 मध्ये शारदीय नवरात्र 11 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे.

पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस

याच दिवशी नवरात्रीच्या खऱ्या उत्सवाला सुरुवात होते.पहिल्या माळेला कोणती देवी असते?पहिल्या दिवशी दुर्गा मातेचे पहिले रूप असलेल्या शैलपुत्री देवीची आराधना केली जाते.

शैलपुत्री म्हणजे कोण?

तर पर्वतांचा राजा हिमालय, त्याची ती मुलगी. म्हणून तिचे नाव शैलपुत्री. फोटोमध्ये बघितले तर एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात कमळ आणि ती नंदीवर बसलेली दिसते. तिच्याकडे बघितले की एक वेगळीच शक्ती आणि शांतता जाणवते. असे म्हणतात की पहिल्या दिवशी तिची मनापासून पूजा केली तर आयुष्यातली अडचणी दूर होतात आणि घरात स्थिरता येते.

नऊ दिवसांच्या नऊ देवीनवरात्रीत रोज वेगवेगळ्या देवीची पूजा होते –

  • पहिली – शैलपुत्री
  • दुसरी – ब्रह्मचारिणी
  • तिसरी – चंद्रघंटा
  • चौथी – कुष्मांडा
  • पाचवी – स्कंदमाता
  • सहावी – कात्यायनी
  • सातवी – कालरात्री
  • आठवी – महागौरी
  • नववी – सिद्धिदात्री
प्रत्येक देवीचा अर्थ वेगळा, तिची शक्ती वेगळी.

पहिल्या दिवसाचा शुभ रंग

यावर्षी पहिल्या दिवसासाठी नारिंगी कलर लकी मानला आहे. नारिंगी म्हणजे जोश आणि पॉझिटिव्ह विचार. त्यामुळे अनेक महिला पहिल्या दिवशी नारिंगी साडी किंवा ड्रेस घालून पूजा करतात. अर्थात हा रंग दरवर्षी पंचांगाप्रमाणे बदलत असतो.

Navratri 2026: नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित, अशा पद्धतीने करा देवीची पूजा

देवीला काय नैवेद्य द्यायचा?

शैलपुत्रीला गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ खूप प्रिय आहेत. त्यामुळे या दिवशी तुपाचा नैवेद्य, गाईचे दूध, खीर, पेढा आणि पांढरी फुले वाहतात. पूजा करताना सगळ्यात महत्वाचे म्हणजे जागा साफ असली पाहिजे आणि मनात भक्ती असली पाहिजे.

घट बसवण्याची वेळ

11 ऑक्टोबरला सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देव्हाऱ्यात घट बसवतात. घटावर कलश ठेवून त्यावर देवीची मूर्ती ठेवली जाते. देवी समोर फुले, अक्षता, धूप, दीप लावून पूजा करतात.

पंचांग बघितले तर 11 तारखेला सूर्योदय 6 वाजून 27 मिनिटांनी होणार आहे. घटस्थापनेसाठी सकाळी 6:27 ते 10:27 ही वेळ एकदम बेस्ट आहे. त्यानंतर अभिजीत मुहूर्त दुपारी 11:57 ते 12:48 पर्यंत आहे.

Navratri 2026: नवरात्रीत अखंड ज्योतीजवळ झोपणे शुभ की अशुभ? काय सांगते धर्मशास्त्र जाणून घ्या

शैलपुत्रीचा मंत्र

पूजेच्या वेळी हा मंत्र म्हणावा -ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥

हा मंत्र म्हणून आरती केल्याने मनाला शांती मिळते असा अनुभव अनेकांनी सांगितला आहे.

पहिली माळ का महत्वाची आहे?

पहिली माळ म्हणजे नवरात्रीचा पाया. या दिवशी पूजा करून आपण पुढच्या नऊ दिवसांसाठी संकल्प करतो. शैलपुत्रीची पूजा केल्याने मन स्थिर होते, कॉन्फिडन्स वाढतो. अनेक लोक या दिवसापासून नऊ दिवस उपवास करतात.नवरात्र हा फक्त सण नाही, तर आपली परंपरा आणि श्रद्धा जपण्याचा काळ आहे. पहिल्या दिवशी शैलपुत्रीला नमस्कार करून आपण या मंगल पर्वाची सुरुवात करूया.

Web Title: Navratri 2026 day 1 maa shailputri puja colour bhog muhurat rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • hindu religion
  • Religion
  • religion news

संबंधित बातम्या

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sant Tiruvalluvar: संत तिरुवल्लुवर कोण होते? जाणून घ्या त्यांच्या ‘तिरुकुरल’चे महत्त्व
2

Sant Tiruvalluvar: संत तिरुवल्लुवर कोण होते? जाणून घ्या त्यांच्या ‘तिरुकुरल’चे महत्त्व

Hanuman Chalisa: हनुमान चालीसा, संकटमोचन अष्टक आणि बजरंग बाण; या तिन्ही रचनांमध्ये काय आहे फरक
3

Hanuman Chalisa: हनुमान चालीसा, संकटमोचन अष्टक आणि बजरंग बाण; या तिन्ही रचनांमध्ये काय आहे फरक

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला पितरांच्या नैवेद्यात या गोष्टी ठेवायला विसरू नका! पितृदोषापासून मिळू शकतो दिलासा
4

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला पितरांच्या नैवेद्यात या गोष्टी ठेवायला विसरू नका! पितृदोषापासून मिळू शकतो दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.