ज्योतिषशास्त्रानुसार, असं म्हटलं जात आहे की, या आठवड्यात चंद्र कर्क राशीत भ्रमण करणार आहे. कर्क राशीचा स्वमी चंद्रदेव असल्याने या आठवड्यात गौरी योग घडत आहे. त्यामुळे याचा शुभ परिणाम काही राशींच्या प्रेम जीवनावर देखील होताना दिसत आहे तर काहींनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात.
मेष : या मंडळींना हा आठवडा प्रेम जीवनासाठी सकारात्मक असणार आहे. प्रेमी जीवनात एकमेकांना समजून घेण्याची तयारी दाखवाल. जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. तसंच भेटीगाठी झाल्याने नात्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.
वृषभ : वृषभेच्य़ा व्यक्तींना हा आठवडा संमिश्र जाईल. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं मनं काहीसं अस्वस्थ राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात, प्रेम जीवनातील सकारात्मक बदलामुळे मानसिक आरोग्या चांगले राहील.
मिथुन: या राशीच्या मंडळींना प्रेमसंबंधात नवे अनुभव मिळणार आहेत. जोडीदाराला वेळ देता य़ेणार असल्याने मन आनंदी राहील.
कर्क : प्रेमासाठी हा आठवडा सकारात्मक असणार आहे. या आठवड्यात जोडीदाराबरोबर स्पष्ट संवाद ठेवा. आठवड्याच्या उत्तरार्धात गैरसमज आणि तणाव मिटतील.
सिंह राशीच्या मंडळींना आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या प्रेम जीवनात भावनिक चढउतार होतील. तुमचे मन अस्वस्थ असणार आहे. मात्र आठवड्याच्या उत्तरार्धात ताण कमी होईल. परस्परांमध्ये प्रेम वाढेल.
कन्या : या आठवड्याच्या सुरुवातीला, तुमच्या प्रेमसंबंधांशी ताण निर्माण होऊ शकतो त्यामुळे मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकतं. आठवड्याचा उत्तरार्ध अनुकूल राहणार असून जोडीराबरोबरच्या नात्यात प्रेम वाढणार आहे.
तूळ : या आठवड्यात, तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनाकडे लक्ष द्यावं लागणार आहे. स्पष्ट बोलला नाही तर नात्यातील अनेक अडतचणींना सामोरं जावं लागेल. मानसिक तणावामुळे झोपेचं गणित बिघडेल.
वृश्चिक : या आठवड्याची सुरुवात तुमच्या आयुष्यात शांती आणि आनंद घेऊन येणार आहे. हा आठवडा रोमँटिक असणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात नातं आणखीनच घट्ट होईल.
धनु : राशीसाठी हा आठवडा प्रेमजीवनासाठी सकारात्मक आहे. तुमच्या प्रेम जीवनात चांगला काळ सुरु होत आहे. मात्र आठवड्याच्या उत्तरार्धात प्रिय व्यक्तीपासूनचे अंतर वाढल्याने मन दुखी होऊ शकते.
मकर : प्रेमात, आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे मन अस्वस्थ असणार आहे. भावनिक समस्या तुमच्या प्रेम जीवनात अडचणी निर्माण करणार आहेत. आठवड्याच्या उत्तरार्धात एक नवीन सुरुवात तुमच्या प्रेम जीवनात शांती आणि आनंद आणणार आहे.
कुंभ : या आठवड्यात प्रेम जीवन अधिक मजबूत होणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंद असणार आहे. या आठवड्यात, तुमच्यापैकी काहींना लग्नाचा प्रस्ताव समोर येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात, तुम्हाला नवीन बदलाबद्दल दुःख वाटणार आहे.
मीन : तुमचे प्रेम जीवन अधिक मजबूत होणार आहे. नात्याच्या भविष्यासाठी महत्वाचे निर्णय घ्याल. आठवड्याच्या उत्तरार्धात, तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






