फोटो सौजन्य- pinterest
आजचा 14 जुलैचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. बुध हा 5 क्रमांकाचा स्वामी ग्रह आहे. आज सर्व अंकांच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव दिसून येईल. आज सोमवार असल्याने स्वामी ग्रह चंद्र आहे त्यामुळे चंद्राची संख्या 2 मानली जाते. मूलांक 2 असलेल्यांना धार्मिक कार्यात रस वाढेल. तर मूलांक 5 असलेल्या लोकांचा उत्साह वाढलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नियोजनपूर्वक काम करावे लागेल. तुमचा आत्मविश्वासही वाढलेला राहील. कामाबद्दल अधिक सावधगिरी बाळगणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांचे नेतृत्व कौशल्य कामाच्या ठिकाणी वाढेल. अहंकार करणे टाळा.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. धार्मिक कार्यामध्ये तुमची आवड राहील. तुमच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवू शकता. तुम्ही कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवू शकतात.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अधिक फायदे होतील. प्रशासन, शिक्षण किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. खर्चावर नियंत्रण करावे लागेल.
मूलांक 4 असलेल्या लोकांना व्यवसायात संयम बाळगायला पाहिजे. कोणताही निर्णय घेताना घाई करु नका अन्यथा नुकसान होऊ शकते. जर तुमच्या कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी वाद सुरु असल्यास त्यातून तुमची सुटका होईल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात अनोळखी लोकांची ओळख होईल त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. तुम्ही उत्साहाने सर्व कामे पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी तुम्ही एकाच वेळी अनेक कामे पूर्ण करू शकाल. कामाशी संबंधित कोणताही प्रवास यशस्वी होऊ शकतो. कोणताही नवीन विचार पुढे नेण्यापूर्वी योग्य नियोजन करणे आवश्यक असेल.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राहील. तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. तुमचे मन शांत राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे काम आणि योजनांवर चर्चा करू शकता. आध्यात्मिक विषयांमध्ये तुमची आवड वाढू शकते. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. दूर राहणाऱ्या नातेवाईकांकडूनही तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकेल.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल. कामात सातत्य राहिल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला समाधान वाटेल. जर तुम्ही पूर्वी किंवा कोणत्याही जुन्या कायदेशीर प्रकरणात गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला यश मिळू शकते. तुमच्या सासरच्या लोकांकडूनही तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी कोणतेही आव्हानात्मक काम पूर्ण केले जाऊ शकते. कुटुंबाच्या दृष्टीनेही आजचा दिवस चांगला जाईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)