फोटो सौजन्य- pinterest
घरामध्ये काही वस्तू ठेवणे शुभ तर अशुभ मानले जाते. जसे की, काटेरी झाडे किंवा वनस्पती, नटराजाची मूर्ती बुडणाऱ्या बोटींचे फोटो, युद्धाचे दृश्ये इत्यादी गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते. वास्तूशास्त्रात दिशेप्रमाणे वस्तू ठेवण्याला देखील महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, अशा वस्तू ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जाणून घ्या कोणत्या वस्तू घरात ठेव नये.
घरातील वातावरण स्वच्छ आणि शांत ठेवण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तूशास्त्राच्या म्हणण्यानुसार घरात काही चित्रे किंवा मूर्ती ठेवल्याने नकारात्मक परिणामांना व्यक्तींना सामोरे जावे लागू शकते.
घरात काटेरी झाडे किंवा त्यांचे चित्र ठेवणे चांगले मानले जात नाही. कारण काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असे मानले जाते. या वनस्पती किंवा त्यांची चित्रे घरात ठेवल्याने घरामध्ये मतभेद होऊ शकतात. वादाची शक्यता निर्माण होते. त्यामुळे घरात सकारात्मकता ठेवण्यासाठी ही वनस्पती घराच्या बाहेर किंवा बागेमध्ये ठेवावी.
नटराजाची मूर्ती ही भगवान शिवाच्या तांडव नृत्याचे प्रतीक मानले जाते. तांडव ही निर्मिती, पालनपोषण आणि संहाराची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये ती संहाराच्या भागाचे प्रतिनिधित्व करते. यामागील अर्थ असा आहे की, ही मूर्ती घरामध्ये ठेवणे अशुभ मानले जाते असे केल्यास घरातील शांतता भंग पावते असे म्हटले जाते.
टायटॅनिकसारख्या बुडत्या बोटींचे फोटो किंवा चित्र घरात ठेवणे चांगले मानले जात नाही. यामुळे व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊ शकतात आणि निराशा, भीती आणि चिंता वाढू शकते. म्हणून, असे फोटो ताबडतोब काढून टाकावेत.
घरात कबरी किंवा दर्ग्याचे फोटो ठेवणे किंवा चित्र लावणे देखील शुभ मानले जात नाही. कारण हे मृत्यूशी संबंधित प्रतीक असल्याचे मानले जाते ते घरातील सकारात्मक ऊर्जा कमकुवत करण्यास मदत करते. यामुळे मानसिक शांतीवरही परिणाम होऊ शकतो.
घरात युद्ध, शिकार किंवा हिंसाचाराशी संबंधित चित्रे ठेवू नयेत. जसे की महाभारत युद्धातील दृश्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या लढाईचे चित्र. भिंतींवर हे लावल्याने कुटुंबात भांडणे आणि मतभेद होऊ शकतात.
घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. घराच्या शांती आणि समृद्धीसाठी, नकारात्मक प्रभाव पाडणारी कोणतीही वस्तू काढून टाकल्याने कुटुंबातील सदस्य निरोगी राहतील, नातेसंबंध मजबूत होतील आणि संपत्तीत वाढ होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)