Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology : कोणाला करिअरमध्ये संधी तर कोणाला कौटुंबिक सुख पण…; जन्मतारखेनुसार कसा असेल मे महिना ?

अंकशास्त्रानुसार तुमची जन्मतारिख तुमचा स्वभाव सांगतेच पण भविष्यात काय घडू शकत हे देखील सांगते. याच अंकशास्त्रानुसार, तुमचा कोणच्या मुलांकाला कसा जाईल मे महिना जाणून घेऊयात सविस्तर.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 02, 2026 | 03:19 PM
फोटो सौैजन्य : गुगल

फोटो सौैजन्य : गुगल

Follow Us
Follow Us:
  • कोणाला करिअरमध्ये संधी तर कोणाला कौटुंबिक सुख पण…;
  • जन्मतारखेनुसार कसा असेल मे महिना ?
 Numerology Horoscope : ज्योतिषशास्त्रात कुंडलीनुसार तुमच्य़ा आयुष्यात होणाऱ्या चढ उतार यांबाबत काही अंदाज लावले जातात. पण याचबरोबर अंकशास्त्र देखील आहे. अंकशास्त्रानुसार तुमची जन्मतारिख तुमचा स्वभाव सांगतेच पण भविष्यात काय घडू शकत हे देखील सांगते. याच अंकशास्त्रानुसार, तुमचा कोणच्या मुलांकाला कसा जाईल मे महिना जाणून घेऊयात सविस्तर.

मूलांक 1 (1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेले लोक)

मुलांक 1 हा सूर्य देवांच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळे ही माणसं त्याच्या करिअरमध्ये सूर्यासारखीच झळकतात. या माणसांमध्ये नेतृत्वगुण जास्त असतात. समाजात यांना मान प्रतिष्ठा असते. या मंडळींसाठी मे महिना हा सकारात्मक असणार आहे. घर आणि कौटुंबिक वातावरण देखील सकारात्मक राहील. या काळात जवळच्या नात्यात मोकळेपणा असणार आहे. तसंच मानसिक आरोग्य निरोगी राहील. झोपेचं गणित सुधारा आणि वेळेवर जेवण करा.

मुलांक 2 (2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)

चंद्र देव हे या मुलांकांचं प्रतिनिधीत्व करता. ही माणसं काहीशी हळवी असतात. या मंडळींना या महिन्यात कामाच्या ठिकाणी काही चढ उतार पाहायला मिळतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी गोंधळून न जाता शांततेत राहा आणि संयम ठेवा. अतिविचार करणं टाळा. नातेसंबंध शांततेत हाताळा. नात्यांमध्ये मोकळा संवाद ठेवल्यास गैरसमज होणार नाहीत. कामावर लक्ष केंद्रीत करा आणि अतिरिक्त खर्च टाळा.

मूलांक 3 (3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक)

देवगुरु बृहस्पती यांचा 3 या मुलांकावर सर्वात जास्त प्रभाव असतो. त्यामुळे ही मंडळी ज्ञानी आणि विचारवंत असतात. या मंडळींना हा महिना नवी ओळख मिळवून देणारा आहे. तुम्ही जर क्रिएटीव्हीमध्ये काम करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी नव्या संधी घेऊन येणारा आहे. . लिखाण, वाचन, संवाद किंवा सल्लागार संबंधित तुम्ही काम करत असाल तर हा महिना तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला विनाकारण होणारा खर्च टाळा. कामावर लक्ष द्या आणि कोण काय बोलतं याचा विचार करु नका.

Shani Sade Sati: शनिची साडेसाती सुरू झाली? शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी करा ‘लाल किताब’ उपाय

मूलांक 4 (4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)

हा महिना तुम्हाला नवं काहीतरी करण्यासाठीचा शुभ काळ आहे. करिअरबाबत काही गोष्टी तुम्हाला आता पटत नसल्या तरी भविष्यात त्याच योग्य ठरतील. नात्यांमध्ये स्पष्टता ठेवा आणि आत्मविश्वासाने मतं मांडा. काही वेळेस मानसिक थकवा येऊ शकतो पुरेसा आराम करा आणि कामावर लक्ष द्या.

मूलांक 5 (5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक)

हा महिना व्यवसायात नवे लाभ देणार आहे. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. या महिन्यात संवाद कौशल्य चांगल राहणार आहे. तब्येतीच्या हलक्या तक्रारी जाणवतील. पुरेशी झोप घ्या आणि आरोग्याची काळजी घ्य़ा.

मूलांक 6 (6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)

मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्यांना हा महिना धावपळीचा राहणार आहे. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष द्या. नात्यामध्ये प्रेम आदर आणि आपुलकी कायम राहणार आहे. अतिविचार करणं टाळा.

मूलांक 7 (7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक)
हा महिना आत्मविश्वासाने राहायला सांगतो. या मुलांकाच्या व्यक्तींनी नात्यात स्पष्टता ठेवावी आणि वाद टाळावेत. लोकांशी संवाद साधा आणि मनात काही ठेवू नका. तब्येतीची काळजी घ्या.

मूलांक 8 (8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक)

मे महिना हा तुमच्या करिअरमध्ये नव्या संधी घेऊन येतील. हा काळ तुमच्या आतापर्यंतच्या मेहनतीला फळ देणारा आहे. कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्यांमुळे ताण वाढेल. त्यामुळे कुटुंबातील माणसांमध्ये काहीशी नाराजी असेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ प्रगती आणि यशाचा आहे.

मूलांक 9 (9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक)

या महिन्यात रखडलेली कामं मार्गी लागतील. नात्यांमधील गैरसमज दूर होतील आणि नात्यात गोडवा येईल. आरोग्याबाबत सांगायचं तर , बाहेर फिरायला जा. यामुळे मानसिक शांतता मिळेल आणि आरोग्य देखील सुधारेल.

May month 2026 Horoscope: मे महिन्यात राजयोगामुळे या राशींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता, अडचणी होतील दूर

 

 

 

Web Title: Numerology what will the month of may be like according to birthdate what does numerology say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • hindu religion
  • mulank
  • numerology

संबंधित बातम्या

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
2

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
3

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
4

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.