फोटो सौजन्य- pinterest
नवरात्रीमधील दुर्गाअष्टमीचा शुभ सण मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी देवीचे आठवे रुप महागौरी देवीची पूजा केली जाणार आहे. अष्टमीच्या दिवशी या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना देवीचा आशीर्वाद मिळेल, तर काही राशीच्या लोकांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये नवीन संधी मिळतील. अष्टमीच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी अष्टमीचा दिवस खूप खास असणार आहे. या दिवशी तुमचे परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते किंवा तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश घेण्याची संधी मिळू शकते. या दिवसात तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. त्यासोबतच व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतील. या दिवशी तुमचे नाते मजबूत आणि गोड असेल.
अष्टमीचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. नवीन संधींचे दरवाजे उघडेल. नोकरी करणाऱ्यांना या दिवशी मोठी ऑफर मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या कल्पना यशस्वी होतील आणि प्रगतीकडे नेतील. जे लोक भागीदारीमध्ये काम करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्हाला इतरांकडून मदत मिळेल. घाईघाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका.
कन्या राशीच्या लोकांसाठी अष्टमीचा दिवस शुभ असणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. तुम्ही तुमच्या संपूर्ण टीमसह या यशाचा आनंद घ्याल. तुमचे सहकारी देखील तुम्हाला पाठिंबा देतील. आर्थिकदृष्ट्या तुमचा आजचा दिवस चांगला राहील. या काळात तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला घेतलेल्या निर्णयांमध्ये अपेक्षित फायदा होईल.
मकर राशीच्या लोकांना अष्टमीच्या दिवशी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. या दिवशी तुमचे मनोबल वाढेल आणि तुम्ही कोणतेही काम पूर्ण उर्जेने पूर्ण कराल आणि यश मिळवाल. यावेळी तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. यामुळे तुम्ही सहज पुढे जाऊ शकाल.
अष्टमीचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. जर तुमची इच्छा असल्यास तुम्ही या काळामध्ये नवीन कामाची सुरुवात करु शकता. त्यामुळे तुमची प्रगती होईल. या दिवशी प्रार्थना, मंत्र जप आणि ध्यान केल्याने मानसिक शांती मिळेल आणि तणाव कमी होईल. तुमच्या कल्पना आणि निर्णयांचे कौतुक केले जाईल. पैशांची गुंतवणूक करताना काळजी घ्या.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)