फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक जीवनामध्ये आदर, यश, भरपूर पैसा हवाच असतो. यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घेणे आवश्यक असते. कठोर मेहनत घेतल्याने व्यक्तीचे नशीबही चमकते. शास्त्रामध्ये उल्लेख केल्यानुसार तळहातावर काही विशिष्ट रेषा किंवा खुणा असतात ज्या व्यक्तीला खूप श्रीमंत आणि यशस्वी होण्याचे संकेत दर्शवतात. ज्या व्यक्तीच्या तळहातावर ही चिन्हे असतात त्या व्यक्ती करोडपती बनतात.
तुमच्या तळहातावर हृद्यरेषा आणि मस्तक रेषेमध्ये क्रॉस (+) चिन्ह असणे खूप शुभ मानले जाते. या चिन्हाला मिस्टिक क्रॉस असे म्हटले जाते. या चिन्हांचा अर्थ व्यक्तीला अत्यंत भाग्यवान, आध्यात्मिक आणि विशेष बुद्धिमत्ता असलेली आहे. या व्यक्तींना कठीण परिस्थितीतही उपाय शोधून आपले नशीब चमकवू शकतात.
हस्तरेखाशास्त्रानुसार, मिस्टिक क्रॉस असलेल्या लोकांना समाजात अनेकदा संपत्ती, समाजामध्ये प्रतिष्ठा आणि नाव कमावतात. हे लोक कोणत्याही विषयावर खोलवर विचार करतात. तसेच आत्मविश्वासाने काम देखील करतात. त्यामुळे ते स्वतःच आपली उंची गाठण्यात यशस्वी ठरतात.
तळहातावर गूढ क्रॉसच्या रेषा नेतृत्व करण्यास सक्षम असतात. अशा लोकांना त्यांच्या जीवनात चांगल्या गोष्टी साध्य करतात. अशा व्यक्तींना अध्यात्म, धर्म आणि परोपकाराची आवड असते. या लोकांमध्ये इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती असते. त्यांच्या या कृतीमुळे हे लोक समाजात एक आदर्श नेता बनण्यास सक्षम ठरतात.
तळहातावरील सर्वांत लहान असलेले बोट म्हणजे करंगळी. हस्तरेखाशास्त्रात करंगळीला बुध बोट म्हटले जाते. या बोटाला बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, व्यवसाय आणि संवादाचे प्रतीक मानले जाते. हस्तरेखाशास्त्रानुसार, जर करंगळीची लांब असेल किंवा तळहाताच्या वरच्या भागावर पोहोचलेली असेल, त्यावर वरच्या भागामध्ये अनेक पातळ उभ्या रेषा असतील. तसेच तळहातावरील स्पष्ट सूर्य रेषा असल्यास व्यक्तीला करिअरमध्ये खूप लाभ होतो. या लोकांना व्यवसाय, शिक्षण, नेतृत्व आणि माध्यमे इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये खूप नाव कमावतात.
या राशीच्या लोकांचा इतर लोकांवर प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्याकडे खूप जास्त असते. शिवाय त्यांचे संवाद कौशल्येदेखील चांगले असते. या सर्व गुणांमुळे ते त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप प्रगती करतात. त्याबरोबरच त्यांच्या कोणी विरुद्ध जात असल्यास त्यांना पराभूत करण्याची प्रचंड शक्ती असते.
असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीच्या तळहातावर दोन रेषा असतात त्या व्यक्तीचे नशीब चमकते. एखाद्या व्यक्तीमध्ये संपत्ती, यश आणि आदर मिळविण्याची जन्मजात क्षमता असते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)