फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये राहू आणि केतूला छाया ग्रह मानले जाते. त्यांच्या हालचाली नेहमी उलट दिशेने होत असतात. जेव्हा त्यांच्या हालचाली उलट परिणाम देतात तेव्हा व्यक्तीला मोठ्या प्रमाणात त्रास, गोंधळ आणि अस्थिरता या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खासकरुन राहू ग्रह अनुकूल नसल्यास तो व्यक्तीला जीवनातील विनाशाकडे नेऊ शकतो. कधीतरी त्याचा प्रभाव तीव्र असल्यास व्यक्तीचे नशीब एकाच रात्रीत चमकण्याची पूर्णपणे शक्यता असते.
ज्योतिषशास्त्रानुसार, राहू ग्रहाला अचानक घडणाऱ्या घटना आणि बदलांचा प्रतिनिधी मानला जातो. त्याच्या या बदलाचा सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही अंगांनी परिणाम होतो. राहू ग्रह त्यांच्या स्थितीवर अवलंबून असतो. काही राशीच्या लोकांच्या कुंडलीत राहू शुभ असल्यास व्यक्तीची समाजात एक अनोखी ओळख असते. राहू ग्रहांच्या महादशेचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होतो, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, राहूची महादशा 18 वर्ष टिकते. यावेळी वेगवेगळ्या ग्रहांची अंतर्दशा देखील येते, ज्यामुळे वेळोवेळी त्याचे परिणाम बदलत राहतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू अशुभ स्थितीत असल्यास त्या व्यक्तीला 18 वर्षे जीवनामध्ये मानसिक ताण, विश्वासघात, गोंधळ, आर्थिक संकट आणि नातेसंबंधांमध्ये तणाव यांसारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे एखाद्याच्या कुंडलीत राहू ग्रह शुभ स्थितीत असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य बदलण्यासाठी 18 वर्ष पुरेशी असतात. या लोकांना अफाट संपत्ती, प्रसिद्धी, यश आणि विलासिता मिळते. राहू ग्रहाच्या महादशेचा शुभ परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होतो, जाणून घ्या.
राहू ग्रहाची आवडती रास सिंह आहे. कारण ही रास एक राजेशाही आणि अग्निमय अशी आहे. यामध्ये नेतृत्व, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठेशी संबंधित आहे. राहू ग्रहाच्या महादशा सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ असते. त्यामुळे या राशीच्या लोकांना राजकारण, प्रशासन, माध्यम, अभिनय आणि इतर मोठ्या गोष्टींमध्ये प्रचंड यश मिळते. अशा परिस्थितीमुळे सिंह राशीच्या लोकांना सुवर्ण संधी, नवीन ओळख, मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या लोकांची सामाजिक वर्तूळ स्थिती विस्तारते. त्याचबरोबर त्यांचे शब्द आणि प्रतिमा देखील लोकांना प्रभावित करतात.
राहू ग्रहाच्या महादशेसाठी वृश्चिक रास ही पाण्यासारखी आहे. ही रास खोली, आत्मनिरीक्षण आणि बदलाशी संबंधित मानली जाते. राहू ग्रह या राशीच्या कुंडलीत शुभ असल्यास यांना अचानक यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळते. राहू बुद्धिमत्ता, रणनीती आणि जोखीम घेण्याची क्षमता वाढवतो त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसाय, संशोधन, गुप्तचर संस्था, तंत्रज्ञान आणि गूढ ज्ञानाशी असलेल्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यात यश प्राप्त होते. तसेच याचा फायदा म्हणजे या लोकांना कधीकधी परदेशी संपर्क असल्यास त्याचा फायदा होतो.
जर राहू ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीत असेल, तर काही सोपे उपाय केल्याने त्याचा त्या व्यक्तीला फायदा होतो. त्यातील पहिला प्रभावी उपाय म्हणजे भगवान शिवाची पूजा करणे आणि नियमितपणे महामृत्युंजय मंत्राचा जप करणे. तसेच शनिवारी वाहत्या पाण्यामध्ये नारळ सोडणे आणि एखाद्या कुत्र्याला चपाती खाऊ घालणे हे उपाय फायदेशीर ठरतात. त्यासोबतच गरिबांना वस्तूंचे दान करणे, त्यांची सेवा करणे त्याचबरोबर दररोज व्यायाम आणि योगा करणे फायदेशीर ठरते. राहूच्या अशुभ स्थितीत हे उपाय केल्याने येणारा ताण आणि गोंधळ दूर होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)