फोटो सौजन्य- istock
आशीर्वाद घेणे किंवा पायांना स्पर्श करणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा मानली जाते. भारतामध्ये वडीलधाऱ्या लोकांच्या पायांना स्पर्श करणे ही आदराची भावना मानली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का काही लोकांच्या पाया पडणे चुकीचे आहे. श्रद्धेनुसार धर्म, तत्वज्ञान आणि सामाजिक मुल्यांवर आधारित आहोत. कोणत्या व्यक्तीच्या पायांना चुकूनही स्पर्श करु नये, जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्रानुसार, तुम्ही एखाद्या मंदिरात आहात तेव्हा तुम्ही कोणाच्याही पायांना स्पर्श करू नये. मान्यतेनुसार असे केल्याने तुम्ही नकळत देवाचा अपमान करत आहात कारण मंदिरात फक्त एकच ऊर्जा असते जी सर्वांत मोठी मानली जाते ती म्हणजे देव. मंदिरात फक्त देवालाच नतमस्तक व्हावे.
एखादी व्यक्ती झोपली असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करणे अशुभ मानले जाते. झोपलेल्या व्यक्तीमध्ये वेगळीच ऊर्जा असते ती पाया पडणाऱ्या व्यक्तीच्या ऊर्जेशी जुळत नाही. आपण सामान्यतः मृत पावलेल्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करतो.
एखादी व्यक्ती स्मशानभूमीतून परत येत असल्यास त्या व्यक्तीच्या पायाला चुकूनही स्पर्श करु नये. कारण स्मशाभूमीमधून परतणाऱ्या व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा संचारत असते ते अपित्र मानले जाते. स्मशानभूमीतून परत येणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडल्याने दोघांनाही नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.
एखादा व्यक्ती अधार्मिक असेल म्हणजेच धर्म मानत नसल्यास त्यांच्या पायांना स्पर्श केल्याने पूर्ण मिळत नाही तर दोष निर्माण होतात. अशा व्यक्तीच्या पायांना स्पर्श केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. या परिणामांमुळे व्यक्तीला जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
जे व्यक्ती पूजा करताना त्यांच्या पायाला कधीही स्पर्श करु नये. कारण जी व्यक्ती पूजा करते ती देवाशी जोडली गेलेली असते. जेव्हा पूजा करणाऱ्या व्यक्तींच्या पायाला स्पर्श केला जातो तेव्हा त्याची पूजा विस्कळीत होते जे अशुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की, पायांना स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
भारतीय परंपरेनुसार जावई आपल्या सासू सासऱ्यांच्या पायांना स्पर्श करु शकत नाही. पौराणिक कथेनुसार, भगवान शिवांनी त्यांचे सासरे प्रजापती राजा दक्ष यांचे डोके कापले होते तेव्हापासून ही प्रथा सुरु झाली असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे जावयाने कधीही सासू सासऱ्यांच्या पायाला स्पर्श करु नये
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)