फोटो सौजन्य- pinterest
हस्तषासास्त्रालाही हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. हस्तषासास्त्राद्वारे एखाद्या व्यक्तीच्या तळहावरील रेषेवरुन त्याचा स्वभाव, व्यक्तिमहत्व तसेच त्यांच्या जीवनात येणाऱ्या समस्या, करिअरमधील स्थान इत्यादी गोष्टी समजते. तळहातावर जीवनरेषा, मेंदूरेषा, हृदयरेषा, आरोग्यरेषा, भाग्यरेषा इत्यादींमुळे आपल्याला भविष्याचा अंदाज लावणे सोपे जाते. हस्तरेशास्त्रात म्हटल्याप्रमाणे आपल्या मनगटाजवळील तळहाताच्या तळापासून सुरू होते. ती थेट मध्यभागातून मधल्या बोटाकडे जाते. या सर्व रेषा करिअर, संपत्ती, अडथळे या सर्व गोष्टींशी संबंधित असतात. जाणून घेऊया या रेषेबद्दल.
हस्तरेखाशास्त्रानुसार, तळहातावरील भाग्यरेषा जर फांदीशिवाय असेल तर ती फळ देत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या करिअरमध्ये येणारे अडथळे समजतात. तळहातावरील भाग्य रेषा या फांद्या असाव्यात म्हणजेच त्या बुध, गुरू किंवा सूर्य पर्वताच्या क्षेत्राकडे जाताना असाव्यात. असे मानले जाते की, फांद्या नसलेल्या रेषा व्यक्तीसाठी हानिकारक ठरु शकतात. जर व्यक्तीच्या हातावरील भाग्य रेषा वरच्या बाजूने सरकल्या असतील तर ते चांगले मानले जाते. पण लहान असलेल्या रेषा व्यक्तीच्या करिअरमध्ये अडचणी आणू शकतात.
असे म्हटले जाते की, जेव्हा भाग्य रेषा व्यक्तीचा तळहात पूर्णपणे संतुलित करते तेव्हा व्यक्तीला त्याचा पूर्ण लाभ मिळतो. भाग्यरेषा व्यक्तीला त्याच्या कारकिर्दीत यशस्वी बनवू शकते. तळहातासह बोटे चांगली विकसित, लांब आणि सरळ असणे महत्त्वाचे आहे. तसेच बोटे तळहाताला जोडलेली असावी सपाट नसावीत आणि ग्रहांचे क्षेत्र देखील चांगले असावेत त्यात कोणताही दोष नसावा. हे नेहमी सरळ आणि लांब असणे गरजेचे आहे.
तळहातावर मस्तिका रेषा असणे गरजेचे आहे म्हणजे ही रेषा लांब, सरळ आणि खोल असावी. ही रेषा गुरु पर्वतावरुन येऊन जीवनरेषेला स्पर्श करते असे म्हटले जाते.
तळहातावर सूर्य रेषेची उपस्थिती असणे खूप गरजेचे मानले जाते. या रेषेच्या मदतशिवाय तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळणे शक्य नसते. या लोकांचे जीवन अडथळ्यांनी भरलेले राहते.
हस्तरेषाशास्त्राच्या मते, तळहावरील अंगठ्यामध्ये इच्छाशक्ती आणि तर्कशक्ती यांचे संतुलन असते. अंगठ्यामधील पहिला गाठ चांगली इच्छाशक्ती दर्शवतो आणि दुसरा गाठ तर्कशक्ती दर्शवतो.
तळहातावरील भाग्यरेषा लहान आणि लहरी नसावी. अशा रेषा जीवनामध्ये अडचणी, अडथळे आणि आर्थिक समस्या दर्शवतात.
जीवनरेषा आतून सुरु होत असल्यास ती प्रेमाचे प्रतीक समजले जाते. पुरूष असेल तर त्याचे जीवन स्त्रीच्या प्रेमावर आधारित मानले जाते तर स्त्री असल्यास त्याचे जीवन पुरुषाच्या प्रेमावर आधारित मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)