फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये मासिक दुर्गाष्टमीचा दिवस दुर्गाला समर्पित आहे. या दिवशी तिला प्रसन्न करण्यासाठी देवीचे भक्त अनेक उपाय करतात. असे म्हटले जाते की, या दिवशी दान केल्याने देवी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या कामांमधील येणारे सर्व अडथळे दूर करते. तसेच जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात, असे देखील म्हटले जाते. मासिक दुर्गाष्टमी कधी आहे, मुहूर्त, कोणत्या गोष्टी दान कराव्यात, जाणून घ्या
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथी बुधवार, 2 जुलै रोजी सकाळी 11.58 वाजता सुरु होणार आहे तर या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार, 3 जुलै रोजी दुपारी 2.6 वाजता संपेल. उद्यतिथीनुसार मासिक दुर्गाष्टमीचे व्रत गुरुवार, 3 जुलै रोजी पाळले जाईल.
दुर्गा देवीचा आवडता रंग लाल आहे. मान्यतेनुसार, लाल रंग हा शक्ती, ऊर्जा, प्रेम आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. पूजेच्या वेळी देवीला लाल रंगांचे वस्त्र आणि चुनरी अर्पण करावी. या गोष्टी अर्पण केल्याने सुख समृद्धी लाभते असे म्हटले जाते. यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते असे म्हटले जाते.
देवीला शक्ती आणि सौदर्यांचे रुप मानले जाते. यावेळी देवीला श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते. विवाहित महिलांनी या दिवशी देवीला मेहंदी, टिकली, काजळ, चुनरी इत्यादी मेकअपच्या वस्तू दान केल्यास देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते. त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख शांती राहते.
तुप हे पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ते दान करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, तुपाचे दान केल्याने सूर्य, चंद्र, मंगळ आणि गुरु या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात, जीवनामध्ये समृद्धी आणि संपत्ती येते. जर तुम्ही शुद्ध गाईचे तूप मंदिरात दान करावे किंवा एखाद्या गरिबाला द्यावे.
बार्ली हे सृष्टीचे प्रतीक आणि पवित्र धान्य आहे. असे मानले जाते की, बार्ली देवी देवतांना दान केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात. यामुळे घरामध्ये कधीही पैशाची आणि अन्नधान्याची कमतरता भासत नाही. तसेच मंदिरत जाऊन बार्ली दान करणे फायदेशीर मानले जाते.
देवीला गोड पदार्थ खूप आवडतात. जर तुम्ही देवीला या दिवशी खीर आणि हलवाचा नैवेद्य दाखवला तर देवी तुमच्यावर प्रसन्न होऊ शकते. तुमच्या जीवनातील त्रास आणि समस्या दूर होतील.
दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचे अन्न दान करु शकता. या दिवशी अन्न दान केल्याने घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही. त्यामुळे कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्नदान करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)