
सातारा जिल्ह्यात देगावजवळ असलेलं पाटेश्वर शिवमंदिर काळाच्या ओघात मागे पडलं. मात्र मंदिराचं वैशिष्ट्यं आणि तेथील मूर्तीची रचना डोळ्यांचं पारण फेडणारी आहेत. या मंदिराचं वैशिष्ट्यं म्हणजे फक्त याचं धार्मिक महत्वच नाही तर इतिहासप्रेमींना देखील हे मंदिर तितकंच भूऱळ पाडतं. पाटेश्वर शिवमंदिर हे केवळ मध्ययुगीन शैव स्थापत्याचे उदाहरण आहे. एवढंच नाही तर वैदिक देवतांच्या मूर्त रूपातील सातत्याचा एक महत्त्वाचा पुरावा आहे.
या मंदिरातील शिवपिंडीबरोबर आणखी एक दुर्मिळ प्रतीमा भाविकांचं लक्ष वेधून घेते. ती म्हणजे अग्नीवृषाची.पंचमहाभूतांना हिंदू धर्मात मोठं महत्व आहे. या पंचतत्वांपैरकी एक म्हणजे अग्नीतत्व. पुराणातील वेद आपल्याला माहित आहेतच त्यातील एक ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये केलेलं अग्नीदेवतेचं वर्णन वैदिक साहित्य, या सगळ्याचा हा एक उत्तम नमुना आहे. या मंदिरातील खास आकर्षण म्हणजे अग्नीवृष किंवा अग्निवृषभाची प्रतिमा. या अत्यंत दुर्मिळ अशा प्रतीमा आहेत. याबाबतची सविस्तर माहिती आर्यभूमी या इन्स्टाग्राम पेजवरुन देण्यात आली आहे.
ऋग्वेदाची सुरुवातच “अग्निमीळे पुरोहितम्” या मंत्राने होते. हिंदू धर्मात पंचमहाभूतांना देवासमान मानलं जातं. त्यापैकी एक म्हणजे अग्नीदेवता. पाटेश्वर शिवमंदिरात अग्नीदेवतेचं पावित्र्य आजही जपलं जातं. अग्नी हा यज्ञाचा पुरोहित, देव आणि मानव यांच्यातील दूत, तसेच यज्ञकर्माचा प्रत्यक्ष साक्षीदार मानला जातो. पुर्नीच्या काळी अग्नीची उपासना प्रामुख्याने अग्निकुंड व मंत्रपरंपरेत मर्यादित होती, आणि त्याचे मूर्त स्वरूप उत्तरवैदिक व ऐतिहासिक काळात विकसित झालं ते हे अग्नीवृष.
पाटेश्वरच्या अग्नीवृष प्रतिमेत अग्नीला वृषभाच्या देहात साकार केलेले दिसते. अग्नीवृष याचा अर्थ अग्नी म्हणजे आग आणि वृष म्हणजे बैल. समोरून पाहिल्यास या मूर्तीला दोन मुखे दिसतात, एक मानवी आणि एक वृषभाचे, ज्यातून अग्नीच्या द्वैध स्वरूपाचे प्रतीकात्मक दर्शन घडते. सात हात आणि तीन पाय ही रचना ऋग्वेदीय सूक्तांतील प्रतीकात्मक संख्यात्मक वर्णनाशी सुसंगत आहे.
ऋग्वेदीय सूक्त आणि मूर्तीतील प्रतिकात्मकता !
ऋग्वेदातील “चार शिंगे, तीन पाय, दोन शिरे आणि सात हात” हे वर्णन अनेक विद्वानांनी अग्नीच्या यज्ञात्मक स्वरूपाचे – प्रतीकात्मक स्पष्टीकरण म्हणून स्वीकारले आहे. ही मूर्ती केवळ देवावरची श्रद्धाच नव्हे तर स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना देखील आहे.
कुशाण काळातील अग्नी : नाणी आणि मूर्ती !
या मंदिराची उभारणी झाली तेच कुशाण काळात. या काळात अग्नीदेवतेचं महत्व अधिक होतं. याचा पुरावा म्हणजे मंदिराच्या आवारात सापडलेली नाणी. कुशाण काळात, विशेषतः कनिष्क व हुविष्क ही नाणी त्यावेळी चलनात होती. या नाण्यांवर अग्नीची प्रतिमा आढळते. हुविष्काच्या सुवर्ण नाण्यांवर दिसणारा बोकडमुखी अथवा अग्नीशी संबंधित देव आकृती, यज्ञ आणि अग्निदेवतेच्या रूपाचे दर्शन घडवते.
मथुरा परिसरातील कुशाणकालीन सामाज्यात अग्नी मूर्तीमध्ये दोन हात, अभयमुद्रा आणि विशिष्ट दंड अथवा ध्वजधारक स्वरूपात मुर्ती आहे. या कुशाण साम्राज्याचा ज्या ज्या ठिकाणी विस्तार झाला त्याठिकाणी स्थापत्यकला रुजत गेली.
कुशाण परंपरा आणि पाटेश्वर प्रतिमा !
कुशाण काळातील अग्नी नाणी आणि मूर्ती यांमधून अग्नी हा स्वतंत्र देवाचं मंदिर आहे. पंचमहाभूतांपैकी एक असलेलं हे अग्नीतत्वांचं पावित्र्य आजही या मंदिरात टिकून आहे.