फोटो सौजन्य- pinterest
सोमवार, 5 जानेवारीचा दिवस. आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र स्वतःच्या कर्क राशीत संक्रमण करणार आहे. सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे. जो सर्व कार्ये पूर्ण करतो. या काळात तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला राहील. सोमवारी शुभ योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस सकारात्मक राहणार आहे. तुमचे सर्व त्रास दूर होऊ शकतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील. तुम्हाला परिस्थितीवर नियंत्रण ठेवायला लागेल. तुम्हाला ज्याची भीती वाटते ती कदाचित घडणारही नाही. नोकरी व्यवसाय करणाऱ्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील.
मिथुन राशीच्या लोकांना सर्वार्थ सिद्धी योगाचा लाभ होणार आहे. या काळात तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला एखाद्या खास नातेवाईकाला भेटण्याची संधी मिळू शकेल. सोशल मीडिया किंवा मित्राकडून चांगली बातमी ऐकू येईल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता.
तूळ राशीच्या लोकांना शुभ योगाचा फायदा होणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यावसायिकांना फायदा होण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. मालमत्तेची खरेदी करु शकता. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या घरी धार्मिक कार्यक्रम देखील होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील.
वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. काहींना नवीन नोकरीच्या ऑफर देखील मिळू शकतात. तुमच्याकडे तुमची क्षमता सिद्ध करण्याची उत्तम संधी आहे. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. नातेसंबंध चांगले राहतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. तसेच तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी देखील व्हाल.
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. तुमच्या आजूबाजूच्या सर्वांना तुमच्या वागण्यात सकारात्मक बदल जाणवू शकतो. तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकेल. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली असाल तर तुमचा आजचा दिवस फायदेशीर राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






