Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा या गोष्टींचे दान

हिंदू धर्मामध्ये अमावस्येचा दिवस खूप विशेष मानला जातो. या दिवशी आपल्या राशीनुसार विशिष्ट वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे इच्छित फळ मिळते आणि ग्रहांच्या नकारात्मक प्रभावांपासून मुक्ती मिळते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 10, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • पिठोरी अमावस्येला दान करण्याचे धार्मिक महत्त्व
  • राशीनुसार कोणत्या वस्तूंचे दान करावे?
  • पिठोरी अमावस्येला दान केल्याने मिळणारे धार्मिक महत्त्व
 

 

हिंदू धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत विशेष मानले जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हटले जाते. या अमावस्येच्या आई आपल्या मुलांच्या सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी पूजा देखील केली जाते. यावेळी अमावस्या दोन दिवस आहे. पंचांगानुसार, यावर्षी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीची सुरुवात १० सप्टेंबर रोजी सकाळी १०:३३ वाजता होणार आहे आणि ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८:५६ वाजता अमावस्या संपणार आहे. यावेळी पिठोरी अमावस्या १० सप्टेंबर रोजी आहे. अशावेळी या दिवशी आपल्या राशीनुसार काही गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे ग्रह दोषही शांत होतात, अशी मान्यता आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी राशीनुसार गोष्टींचे दान करावे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांनी पिठोरी अमावस्येला लाल मसूर किंवा गूळ दान करणे शुभ मानले जाते आणि यामुळे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

वृषभ रास

पिठोरी अमावस्येला वृषभ राशीच्या व्यक्तींनी साखरेचे दान करावे, कारण त्यामुळे त्यांच्या सुखसोयी आणि ऐषारामात वाढ होते असा विश्वास आहे.

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांनी पिठोरी अमावस्येच्या दिवशी हिरव्या भाज्या किंवा हिरवे कपडे दान करणे शुभ मानले जाते.

Pithori Amavasya: मुलांच्या सुख-समृद्धीसाठी पिठोरी अमावस्येला केली जाते ‘ही’ खास पूजा; जाणून घ्या महत्त्व

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांनी पिठोरी अमावस्येच्या दिवशी पैसे दान करणे फायदेशीर ठरेल. यामुळे चांगले भाग्य लाभू शकते.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी मिठाई दान करू शकतात, ज्यामुळे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता असते.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हिरवे मूग दान करणे शुभ असते. यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मकता वाढू शकते.

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांनी पिठोरी अमावस्येच्या दिवशी तांदळाचे दान करावे. धार्मिक श्रद्धेनुसार, तांदळाचे दान केल्याने शुभ परिणाम मिळतात.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांनी पिठोरी अमावस्येच्या दिवशी लाल रंगाच्या वस्तू दान कराव्यात.

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्या कधी आहे? ६४ योगिनींची पूजा करण्यामागील परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी पिठोरी अमावस्येच्या दिवशी त्यांच्या विवाहाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी चणा डाळीचे दान करू शकतात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी तिळाचे दान करणे शुभ मानले जाते.

कुंभ रास

कुंभ राशीचे लोक पिठोरी अमावस्येच्या दिवशी पैसे किंवा कपडे दान करू शकतात.

मीन रास

मीन राशीचे लोक हळद किंवा पिवळ्या रंगाच्या मिठाईंचे दान करू शकतात, जे तुमच्यासाठी फायदेशीर मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pithori amavasya 2026 donate these things according to your zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • amavasya
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi: ऑक्टोबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ
1

Sankashti Chaturthi: ऑक्टोबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ

Guru Gochar 2026: दिवाळीआधी गुरू ग्रहाची कृपा! या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश
2

Guru Gochar 2026: दिवाळीआधी गुरू ग्रहाची कृपा! या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश

Dream Meaning: कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे स्वप्न पडण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या
3

Dream Meaning: कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे स्वप्न पडण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या

Dev Pooja Rules: देवपूजेपूर्वी घर शुद्ध करायचे आहे? गोमूत्राऐवजी वापरा या गोष्टी
4

Dev Pooja Rules: देवपूजेपूर्वी घर शुद्ध करायचे आहे? गोमूत्राऐवजी वापरा या गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.