Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksh: मृत्यूनंतरही तहान भूक लागते का? गरुड पुराणात सांगितले आहे श्राद्ध तर्पणाचे रहस्य

Pitru Paksh: पितृपक्षात पूर्वजांच्या स्मरणार्थ श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याची परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाबाबत गरुड पुराणात विविध वर्णने आढळतात. त्यामुळे मृत्यूनंतर पितरांना तहान-भूक लागते का आणि श्राद्ध-तर्पणाचे त्यांच्याशी नेमके नाते कोणते, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतो. जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 27, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • मृत्यूनंतर आत्म्याला तहान-भूक लागते का?
  • गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासाबाबत काय सांगितले आहे?
  • मृत्यूनंतर आत्म्याला अन्न-पाणी कसे मिळते, याबाबत धार्मिक वर्णन
 

 

 

गणपतीची धामधूम संपून आज 27 सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झाली आहे. मृत्यूनंतर माणसाचं काय होतं? शरीर सोडल्यानंतरही भूक आणि तहान लागते का? श्राद्ध करताना अन्न आणि पाणी अर्पण करण्याच्या परंपरेमागे नक्की काय कारण आहे असे प्रश्न लोकांच्या मनात अनेकदा येतात. हिंदू धर्मात गरुड पुराणाद्वारे भगवान विष्णूंनी स्वतः त्यांचे वाहन गरुडाशी संवाद साधताना अशा अनेक प्रकारची उत्तरे दिली आहेत. मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण यामागील कारण जाणून घेणार आहोत

श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण म्हणजे काय

श्राद्ध हा शब्द श्रद्धा या शब्दांवरून आला आहे. ज्याचा अर्थ पूर्वजांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणं असा आहे. गरुड पुराणानुसार श्राद्धाच्या वेळी त्यांना अर्पण केलेला नैवेद्य त्यांना वर्षभरात सूक्ष्म स्वरुपात संतुष्ट करतो. त्यामुळे ते प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुख शांती आणि समृद्धी व संततीचा आशीर्वाद देतात असा समज आहे.

Pitru Paksha: २७ सप्टेंबरला पितृपक्षातील पहिले श्राद्ध, जाणून घ्या तर्पण दान करण्याचे महत्त्व

पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी देखील तर्पण केलं जातं. कुशा गवत, काळे तीळ आणि जव हातात घेऊन पाण्यासोबत पूर्वजांना अर्पण केले जातात. गरुड पुराणानुसार अशा प्रकारे त्यांना अर्पण केलेलं पाणी त्यांची तहान भागवते. मोक्ष प्राप्तीसाठी किंवा आत्म्याच्या पुढील प्रवासाला मदत करण्यासाठी गया, हरिद्वार, प्रयागराज इत्यादी तीर्थक्षेत्रावर पिंडदान केलं जातं. यामुळे दिवंगत आत्मा भौतिक बंधनातून आणि आसक्तीतून मुक्त होतो असा समज आहे.

अनेक ठिकाणी असा विश्वास आहे की पिंडदान केल्यानंतर पूर्वजांसाठी किंवा मृत व्यक्तीसाठी श्राद्ध करण्याची किंवा तर्पण करण्याची गरज उरत नाही.

आता मुख्य प्रश्न मृत्यूनंतर खरचं भूक आणि तहान लागते का?

गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जेव्हा आत्मा शरीर सोडून यमलोकांच्या खडतर प्रवासाला निघतो तेव्हा त्याला भूक आणि तहान लागते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला उर्जेची गरज असते जी त्याला त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या पिंडदानातून मिळते म्हणूनच मृत्यूनंतर दहा दिवस पिंड अर्पण केल्याने आत्म्याला यमलोकांचा लांबचा प्रवास पार करण्याची शक्ती मिळते.

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

त्यामुळे मृत्यूनंतर 13 दिवस हे विधी दररोज केले जातात. इतकेच नाही तर गरुड पुराणानुसार 13 व्या दिवसानंतरही पितृलोकात निधन पावलेल्या लोकांना संतुष्ट करणं आवश्यक असतं. म्हणूनच पितृपक्षात दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी कुटुंबातील सदस्य तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात. गरुड पुराणानुसार, हे विधी केवळ पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठीच नाही तर त्यांचे ऋण फेडण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुखद होण्यासाठी केला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pitru paksh 2026 do you feel thirsty and hungry even after death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • garud puran
  • hindu religion
  • Pitru Paksha

संबंधित बातम्या

Pitru Paksha: २७ सप्टेंबरला पितृपक्षातील पहिले श्राद्ध, जाणून घ्या तर्पण दान करण्याचे महत्त्व
1

Pitru Paksha: २७ सप्टेंबरला पितृपक्षातील पहिले श्राद्ध, जाणून घ्या तर्पण दान करण्याचे महत्त्व

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा
2

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
3

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
4

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.