Pitru Paksha 2025: पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी शनि होणार वक्री, या राशीच्या लोकांच्या जीवनात होतील बदल
पितृपक्षाची सुरुवात रविवार, 7 सप्टेंबरपासून होत आहे आणि त्याच दिवशी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण देखील आहे. दुसरे चंद्रग्रहण शनिच्या कुंभ राशीमध्ये होणार आहे. ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग अनेक राशीच्या लोकांमध्ये मोठा बदल घडवून आणू शकते. ज्योतिषशास्त्रामध्ये ज्यावेळी एखादा ग्रह वक्री होतो त्यावेळी त्याची गती मंदावते आणि त्याचा प्रभाव देखील वाढतो. शनिचा प्रभाव मिथुन, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असू शकतो. शनिच्या वक्रीचा या राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या राशी, जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्रानुसार कसा असेल ग्रहणाचा प्रभाव
ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहण काळ खूप महत्त्वाचा मानला जातो. या काळात ग्रहांच्या हालचालीत विशेष बदल होतात. चंद्रग्रहणाच्या दिवशी शनि वक्री स्थितीत म्हणजेच उलट गतीत राहणार आहे. ज्याला कर्म आणि न्यायाचा कारक मानला जातो. शनिची वक्री अनेक लोकांसाठी नवीन शक्यता आणि बदलांचा मार्ग मोकळा करेल.
कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिची वक्रीमुळे करिअर आणि आर्थिक प्रगतीमध्ये अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या पगारात अपेक्षित वाढ होऊ शकते. व्यावसायिकांना या काळात मोठे यश मिळू शकते. तसेच तुमच्यामधील आत्मविश्वास देखील वाढेल. तुम्ही नवीन योजना आखू शकता त्या यशस्वीरित्या पूर्ण होतील.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो. या काळात सामाजिक प्रतिष्ठा आणि कौटुंबिक संबंध मजबूत होतील. शनिच्या वक्रीच्या हालचालीमुळे तुमचे समाजात सन्मान आणि आदर वाढेल आणि समाजात तुमचा दर्जा वाढेल. कुटुंबात सुरू असलेल्या जुन्या समस्या दूर होतील. तसेच कुटुंबामध्ये आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही तुम्हाला अपेक्षित फायदा मिळू शकतो. लग्नाची योजना आखणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे.
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी शनि वक्रीचा हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळामध्ये तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. शिक्षण असो, नोकरी असो किंवा व्यवसाय असो, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो. परदेश प्रवास असो किंवा परदेशांशी संबंधित कामात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या काळामध्ये तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होतील.
Mahalakshmi Rajyog: शारदीय नवरात्रीला महालक्ष्मी राजयोग, या राशीच्या लोकांना लाभेल सुख समृद्धी
या गोष्टी ठेवा लक्षात
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)