(फोटो सौजन्य: Pinterest)
प्रत्येक व्यक्तीला आपले कुटुंब आनंदी राहावे, जोडीदाराने नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करत राहावे, असे वाटत असते. मात्र कधीकधी खूप मेहनत घेऊन देखील अपेक्षित यश मिळत नाही. घरामधील वातावरण आणि घरात असलेल्या वस्तूंमुळे व्यक्तीच्या यशावर आणि आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार, घरात योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवलेल्या वस्तू जीवनात सकारात्मक बदल आणू शकतात. जर तुम्हाला तुमच्या पतीचे करिअर पुढे जात राहावे, त्यात अपेक्षित यश मिळावे, आर्थिक स्थिती स्थिर राहावी असे वाटत असल्यास घरामध्ये वास्तूचे असे काही सोपे उपाय केल्याने तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. जाणून घ्या पतीला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळविण्यासाठी वास्तूचे कोणते सोपे उपाय करायचे.
Anant Chaturdashi 2025: बाप्पाच्या विसर्जनानंतर मागे वळून का पाहू नये, जाणून घ्या यामागील कारणे
मनी प्लांट
तुम्ही घरामध्ये उत्तर दिशेला निळ्या रंगांच्या बाटलीमध्ये मनी प्लांट लावला तर ते तुमच्या पतीच्या करिअरमध्ये वाढ होण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मनी प्लांटला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. निळ्या बाटलीमध्ये हे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पतीचे करिअर प्रगतीपथावर जाते.
लक्ष्मी देवीचा फोटो लावणे
घरामधील आग्नेय दिशा ही देवी लक्ष्मीची संपत्तीची दिशा मानली जाते. यामुळे या दिशेला देवी लक्ष्मीचे चित्र लावल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तसेच आर्थिक स्थिती देखील सुधारेल. आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तसेच या ठिकाणी चित्र लावल्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि अचानक होणारे खर्च देखील दूर होतात.
या दिशेला होते पतीची कामगिरी
जर तुमच्या पतीकडे शैक्षणिक प्रमाणपत्रे, ऑफिस पुरस्कार, पदके किंवा ट्रॉफी इत्यादी गोष्टी असल्यास त्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवा. असे केल्याने पतीला व्यवसायामध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतात. पदोन्नतीची शक्यता निर्माण होते. समाजामध्ये त्याचे नाव होते. कीर्ती देखील वाढू लागते. हे स्थान यशांना बळकटी देते आणि खूप मेहनत घेतल्याने त्याला लवकर अपेक्षित ते फळ मिळते.
कार्यालयाची वास्तू या दिशेला असावी
तुमच्या पतीच्या ऑफिसशी संबंधित वस्तू घरामध्ये असल्यास घराच्या पश्चिम दिशेला असावी जसे की, लॅपटॉप, ऑफिसच्या फाईल्स किंवा कोणतेही महत्त्वाचे कागदपत्रे इत्यादी गोष्टी घराच्या पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे व्यवसायात आणि करिअरमध्ये वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे व्यक्तीच्या कामामध्ये कामात स्थिरता आणि यश आणतात.
Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहणात या राशीच्या लोकांना बाळगावी लागणार नाही भीती, उत्पन्नात होईल वाढ
सकारात्मकतता टिकवून ठेवण्यासाठी करा हे उपाय
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)