Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Old Clothes Donate Rules: जुने कपडे दान करताय? जाणून घ्या ‘हे’ महत्त्वाचे नियम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

हिंदू धर्मग्रंथांमध्ये दानाला अत्यंत पुण्याचे कर्म मानले गेले आहे. मात्र जुने कपडे दान करताना काही धार्मिक नियम आणि परंपरा पाळणे महत्त्वाचे मानले जाते, अन्यथा दानाचे अपेक्षित फळ मिळत नाही असे सांगितले जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 12, 2026 | 01:19 PM
जुने कपडे दान करताय? जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जुने कपडे दान करताय? जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Follow Us
Follow Us:
  • जुने कपडे दान करण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून मीठाच्या पाण्यात ठेवून सुकवावेत, असे धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते.
  • फाटलेले, घाणेरडे किंवा वापरण्यायोग्य नसलेले कपडे दान करू नयेत.
  • गुप्तपणे केलेले दान सर्वोत्तम मानले जाते आणि अमावस्या, पौर्णिमा तसेच शनिवार हे दानासाठी शुभ दिवस मानले जातात.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक काम करण्याचे काही नियम आणि पद्धती सांगितल्या आहेत. यामध्ये दान करण्यासंबंधित काही महत्त्वपूर्ण नियमांचा देखील समावेश आहे. प्रत्येक धर्मात दान करणं हे सर्वात चांगल्या कर्मांपैकी एक मानले जाते. मात्र दान करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा दान करण्याचे पुण्य मिळत नाही. उलट, दान करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर आपलं नुकसान होऊ शकतं.

Kala Dhaga: हातात काळा धागा बांधण्याचे नियम, सर्वांनाच नसतो फलदायी; वाईट नजर आणि नकारात्मक उर्जेपासून कसे वाचाल

जुने कपडे दान करण्याचा विचार करताय?

तुम्ही तुमचे किंवा घरातील व्यक्तींचे जुने कपडे दान करण्याचा विचार करत आहात का? जुने कपडे दान करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा आपण सण आणि उपवासांसारख्या शुभ प्रसंगी गरीब आणि गरजू लोकांना जुने कपडे दान करतो. मात्र यादरम्यान आपण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. ज्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं. (फोटो सौजन्य – AI Created)

दान करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

कधीही जुने कपडे दान करण्यापूर्वी त्यांना व्यवस्थित स्वच्छ धुवा. त्यानंतर हे कपडे काही वेळासाठी मीठाच्या पाण्यात ठेवा आणि त्यानंतर पूर्णपणे सुकल्यानंतरच गरीब आणि गरजू लोकांना द्या. ही क्रिया करण्याचे कारण असे आहे की, असं मानलं जातं की, कपड्यांमध्ये आपली सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात. मीठाच्या पाण्याने कपडे धुतल्यामुळे ऊर्जा त्याच ठिकाणी नष्ट होते. यानंतर कोणत्याही व्यक्तीने ते कपडे परिधान केले तरी देखील त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

चांगले कपडे दान करा

कधीही जुने, फाटलेले किंवा खराब-घाणेरडे कपडे कोणालाही दान करू नका. असे केल्यास पुण्य मिळवण्याऐवजी पापाचे भागिदारी बनू शकता. कपडे नेहमी धुवून, स्वच्छ करून दान करावे. जर कपडे फाटले असतील तर त्यांना व्यवस्थित शिवून दान करावे.

काय आहे वेद-पुराणांमधील अश्वमेध यज्ञ? या पौराणिक आणि ऐतिहासिक विधीमागील सत्य जाणून घ्या!

शास्त्रानुसार, दान असे करावे की, डाव्या हाताने द्यावे अन् उजव्या हाताला त्याची जाणीवही होऊ नये. अन्यथा पुण्य प्राप्त होत नाही. म्हणूनच, धार्मिक ग्रंथांमध्ये गुप्तपणे केलेल्या दानाला सर्वोत्तम मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, कपडे दान करण्यासाठी सकाळची वेळ, अमावस्या तिथी, पौर्णिमा आणि शनिवार हे सर्वात चांगले दिवस मानले जातात.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Planning to donate old clothes know these important rules to avoid negative effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Astro
  • astro tips
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Mangalsutra: शुभ कामात काळा रंग वर्ज्य, मग मंगळसूत्रात काळे मणी का असतात? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक मान्यता
1

Mangalsutra: शुभ कामात काळा रंग वर्ज्य, मग मंगळसूत्रात काळे मणी का असतात? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक मान्यता

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…
2

Vastu Tips for Wallet: पाकीट रिकामं होण्यामागे ‘या’ ५ वस्तू कारणीभूत? वास्तुशास्त्र काय सांगतं जाणून घ्या…

Vastu Tips: घरासाठी नेमप्लेट कोणत्या मटेरियलची असावी? लाकूड, मेटल की दगड; काय आहे शुभ
3

Vastu Tips: घरासाठी नेमप्लेट कोणत्या मटेरियलची असावी? लाकूड, मेटल की दगड; काय आहे शुभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.