फोटो सौजन्य- pinterest
प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत करणे महत्त्वाचे आहे. हे व्रत भगवान शिव आणि पार्वतीच्या पूजेसाठी महत्त्वाचे आहे. प्रदोष काळामध्ये पूजा केल्याने शिवाच्या कृपेने आनंद, समृद्धी आणि यश मिळते. प्रदोष व्रत महिन्यातून दोन वेळा पाळले जाते. असे मानले जाते की, या दिवशी भगवान शिवाच्या पूर्ण कुटुंबाची पूजा केल्याने व्यक्तीला त्याचा फायदा होतो. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात, जाणून घ्या
असे मानले जाते की, शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण केल्याने व्यक्तीला फायदा होतो त्यासोबतच आर्थिक समस्येतून सुटका होते. त्याशिवाय या दिवशी शिवलिंगावर अभिषेक देखील करावा. शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात, जाणून घ्या
पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील त्रयोदशी तिथीची सुरुवात सोमवार, 7 जुलै रोजी रात्री 11.10 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती मंगळवार, 8 जुलै रोजी दुपारी 12.38 वाजता होईल. उदयतिथीनुसार, प्रदोष व्रत 8 जुलै रोजी पाळले जाणार आहे.
जर तुम्हाला संपत्ती मिळवायची असल्यास प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे तांदूळ अर्पण करावे. असे केल्याने धनप्राप्तीची शक्यता वाढते आणि जीवनामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही, असे म्हटले जाते.
भगवान शिवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी शिवलिंगावर तीळ अर्पण करावे. मान्यतेनुसार, शिवलिंगावर तिळाचा अभिषेक केल्याने भक्तांचा सर्व पापांपासून मुक्तता होते, अशी मान्यता आहे.
प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर गहू आणि धतुराचा अभिषेक करावा. असे केल्याने जीवनात सुख शांती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार, हा उपाय केल्याने संततीचे सुख मिळते आणि शिवाचा आशीर्वाद देखील आपल्यावर राहतो.
शिवाला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर लाल चंदन अर्पण करावे. असे म्हटले जाते की, हा उपाय केल्याने कुंडलीमधील सूर्य बलवान होऊन व्यक्तीचा मान आणि सन्मान वाढतो आणि प्रलंबित काम पूर्ण होते.
चातुर्मासाच्या पवित्र काळामध्ये हे व्रत करणे खूप शुभ मानले जाते. चातुर्मास हा आध्यात्मिक काळ आहे जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रामध्ये जातात. यावेळी धार्मिक, मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा सक्रिय होते असे मानले जाते. त्यामुळे शिवपूजेचे महत्त्व अधिक पटींनी वाढलेले असते. प्रदोष व्रत हे मंगळवारी येत असल्याने त्याला भौम प्रदोष व्रत असे म्हटले जाते. यावेळी भक्त शिवलिंगावर पाणी, दूध आणि पंचामृताने अभिषेक करतात. तसेच मंत्राचा जप करुन आरती केली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)