
फोटो सौजन्य- pinterest
राहू आणि केतू हे ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे ग्रह मानले जातात. या दोन्ही ग्रहांचे राशी आणि नक्षत्र बदल खूप महत्त्वाचे मानले जातात. राहू आणि केतू यांना ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह आणि पाप ग्रह मानले जाते. दोन्ही ग्रह नेहमी उलट दिशेने फिरतात. पंचांगानुसार, राहू आणि केतू नोव्हेंबरच्या शेवटी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी आपले नक्षत्र बदलणार आहे. राहू पूर्वा भाद्रपद सोडून शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
केतू पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्यातून बाहेर पडणार आहे आणि त्याच नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करणार आहे. राहू आणि केतूच्या हालचालीत होणारे बदल 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता होणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ज्यावेळी दोन ग्रहांची हालचाल बदलते त्यावेळी त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. राहू केतू नक्षत्र बदलाचा परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आहे ते जाणून घ्या
राहू आणि केतूचे नक्षत्र बदल तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक राहील. तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आर्थिक लाभाच्या नवीन संधी तयार होतील. तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
राहू आणि केतूचे नक्षत्र बदल धनु राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. या काळात धनु राशीचे लोक आर्थिक प्रगती करू शकतात. तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढतील. तुम्ही परदेश प्रवास करू शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित संधी मिळतील. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसू शकतात.
राहू आणि केतूचे नक्षत्र बदल मकर राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल असणार आहे. या काळात मकर राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि पदोन्नतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. प्रत्येक प्रयत्नात यश मिळणे शक्य आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारू शकते. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: राहू केतूचे नक्षत्र परिवर्तन 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे
Ans: राहू केतच्या नक्षत्र बदलाचा सकारात्मक परिणाम तूळ, धनु आणि मकर राशीच्या लोकांना होणार आहे
Ans: राहू केतूचे नक्षत्र बदल 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता होणार आहे