Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी वाचा ‘ही’ कथा

Pradosh Vrat: कार्तिक महिन्यातील प्रदोष व्रत आज रविवार, २२ नोव्हेंबर रोजी आहे. भगवान शिव आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रवी प्रदोष व्रत अत्यंत विशेष मानले जाते. या दिवशी उपवास केल्याने आणि कथा वाचल्याने आणि ऐकल्याने जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत होते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 22, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • रवी प्रदोष व्रत कधी आहे
  • भगवान शिव आणि सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी वाचा ही कथा
  • रवी प्रदोष व्रताचे महत्त्व
 

आज, रविवार, २२ नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला रवी प्रदोष व्रत पाळले जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, प्रदोष काळात विहित विधींनुसार भगवान शिवाची पूजा करून उपवास केल्याने जीवनातील कष्ट दूर होतात. आज प्रदोष पूजेसाठी शुभ मुहूर्त सायंकाळी ५:२५ ते रात्री ८:०६ पर्यंत आहे.

हा दिवस रविवारी येत असल्यामुळे याला रवी प्रदोष व्रत म्हणतात. या उपवासादरम्यान भगवान शिव आणि सूर्यदेवाची पूजा करणे विशेष फायदेशीर मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, रवी प्रदोष व्रत पाळल्याने उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी उपवास करण्यासोबतच रवी प्रदोष कथा वाचणे किंवा ऐकणे देखील शुभ मानले जाते. रवी प्रदोष व्रतामागील पौराणिक कथा जाणून घेऊया.

रवी प्रदोष व्रताची कथा

आख्यायिकेनुसार, एका गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण आपल्या पत्नी आणि मुलासह राहत होता. त्याची पत्नी खूप धार्मिक आणि भगवान शिवाची भक्त होती. ती नियमितपणे प्रदोष व्रत पाळत असे आणि भगवान शिवाची पूजा करत असे. एके दिवशी, तिचा मुलगा गंगेत स्नान करण्यासाठी घरातून बाहेर पडला. वाटेत त्याला काही दरोडेखोर भेटले. त्यांनी मुलाकडे लपवलेल्या खजिन्याची मागणी केली, पण जेव्हा त्यांना कळले की तो एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा आहे आणि त्याच्याकडे कोणतीही संपत्ती नाही, तेव्हा त्यांनी त्याला सोडून दिले.

Kartik Purnima 2026: कार्तिक पौर्णिमेला स्नान-दानासाठी ‘या’ वस्तू मानल्या जातात शुभ

तो मुलगा पुढे चालत एका शहराच्या बाहेरच्या भागात पोहोचला. खूप दमल्यामुळे तो एका वडाच्या झाडाखाली झोपी गेला. त्याचवेळी, दरोडेखोरांच्या शोधात शहरातून काही सैनिक तिथे आले. त्यांना तो मुलगा संशयास्पद वाटला आणि त्यांनी त्याला अटक करून राजासमोर हजर केले. राजाने कोणतीही सखोल चौकशी न करता, त्याला चोर समजून तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला.

ज्यावेळी मुलगा घरी परतला नाही, तेव्हा त्याच्या आईला काळजी वाटू लागली. त्या दिवशी ती प्रदोष व्रताचा उपवास केला होता. तिने सर्व विधीपूर्वक भगवान शिवाची पूजा केली आणि आपल्या मुलाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. आईच्या भक्तीवर प्रसन्न होऊन, भगवान शिव त्या रात्री राजाला स्वप्नात दिसले.

भगवान शिवाने राजाला सांगितले की, त्याने चोर म्हणून तुरुंगात टाकलेला मुलगा पूर्णपणे निर्दोष आहे. त्यांनी राजाला ताकीद दिली की, जर पहाटेपूर्वी मुलाला सोडले नाही, तर त्याचे राज्य आणि वैभव नष्ट होईल.

सकाळ होताच राजाने मुलाला तुरुंगातून सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर त्याने मुलाला त्या घटनेबद्दल विचारले आणि सत्य समजल्यावर त्याच्या आईवडिलांना राजदरबारात बोलावले. त्या ब्राह्मण कुटुंबाचे दारिद्र्य कमी करण्यासाठी राजाने त्यांना पाच गावे दान केली.

याप्रकारे भगवान शिवाच्या कृपेने आणि प्रदोष व्रताच्या प्रभावाने त्या गरीब ब्राह्मण कुटुंबाच्या जीवनात समृद्धी आली. अशी श्रद्धा आहे की, जो कोणी भक्ती आणि श्रद्धेने रवी प्रदोष व्रत पाळतो आणि या दिवशी कथा वाचतो किंवा ऐकतो, त्याला भगवान शिव आणि सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो.

Tulsi Vivah: तुळशी विवाहाची प्रत्येक राज्यातील पद्धत वेगळी! महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंतच्या खास परंपरा जाणून घ्या

रवी प्रदोष व्रताचे महत्त्व

रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे तर प्रदोष व्रत हा भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. त्यामुळे, जेव्हा त्रयोदशी तिथी रविवारी येते, तेव्हा शिव आणि सूर्यदेव या दोघांचीही पूजा एकाच वेळी होते. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने आरोग्य, दीर्घायुष्य, मान, सुख आणि समृद्धी प्राप्त होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रवि प्रदोष व्रत म्हणजे काय?

    Ans: रविवारी प्रदोष तिथी आल्यास त्या दिवशी केलेल्या शिवपूजेला रवि प्रदोष व्रत असे म्हणतात.

  • Que: रवि प्रदोष व्रताचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार, रवि प्रदोष व्रत केल्याने भगवान शिवाची कृपा आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो

  • Que: रवि प्रदोष व्रताला उपवास करणे आवश्यक आहे का?

    Ans: अनेक भाविक या दिवशी उपवास करतात. मात्र, उपवास करण्याची पद्धत व्यक्तीच्या श्रद्धा आणि आरोग्यानुसार ठरवली जाते.

Web Title: Read pradosh vrat katha to please lord shiva and sun god pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Kartik Purnima 2026: कार्तिक पौर्णिमेला स्नान-दानासाठी ‘या’ वस्तू मानल्या जातात शुभ
1

Kartik Purnima 2026: कार्तिक पौर्णिमेला स्नान-दानासाठी ‘या’ वस्तू मानल्या जातात शुभ

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Shadashtak Yog: २२ नोव्हेंबरला सूर्य-चंद्र तयार करणार षडाष्टक योग; वृषभसह ‘या’ राशीच्या लोकांनी राहावे सावध
3

Shadashtak Yog: २२ नोव्हेंबरला सूर्य-चंद्र तयार करणार षडाष्टक योग; वृषभसह ‘या’ राशीच्या लोकांनी राहावे सावध

Tulsi Vivah Rangoli: तुळशी विवाहाच्या वेळी संध्याकाळी काढा सुंदर रांगोळी; पाहा आकर्षक डिझाइन्स
4

Tulsi Vivah Rangoli: तुळशी विवाहाच्या वेळी संध्याकाळी काढा सुंदर रांगोळी; पाहा आकर्षक डिझाइन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.