तुळशी विवाहाच्या वेळी संध्याकाळी काढा सुंदर रांगोळी
रांगोळीच्या मध्यभागी तुळशी वृंदावनाची प्रतिकृती काढा. त्याभोवती फुलांच्या पाकळ्या, पानं आणि दिव्यांची सजावट करा.
गुलाबी, पिवळा, हिरवा आणि केशरी रंग वापरून गोलाकार फुलांची रांगोळी काढा. मध्यभागी 'शुभ तुळशी विवाह' असे लिहून भोवती पणत्या लावा
तुळशी विवाहात भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे राधा-कृष्णाची आकृती असलेली रांगोळी काढून पूजेच्या जागेची शोभा वाढवू शकता.
स्वस्तिक, ॐ, कमळ आणि लक्ष्मीच्या पावलांची आकृती वापरून सुंदर रांगोळी काढता येते. ही डिझाइन तुळशी विवाहाच्या पूजेसाठी खास ठरेल.
रांगोळीच्या भोवती मातीच्या पणत्या आणि झेंडूच्या फुलांची सजावट करा. संध्याकाळच्या दिव्यांच्या प्रकाशात ही रंगीत रांगोळी अधिक सुंदर दिसेल.