फोटो सौजन्य- pinterest
आषाढ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गजानन चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी शुभ व्रत पाळले जाते. या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहे. आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या
आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच संकष्टी चतुर्थी म्हणतात. यालाच गजानन चतुर्थी म्हटले जाते. यावेळी 4 शुभ योगामध्ये ही पूजा केली जाणार आहे. हे व्रत गणपती बाप्पाला समर्पित आहे. सकाळच्या वेळेमध्ये गणपतीची पूजा केली जाते. या दिवशी गणपतीचे भक्त उपवास पाळतात.
पंचांगानुसार, जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत सोमवार, 14 जुलै रोजी पहाटे 1.2 वाजता सुरु होईल आणि त्याची समाप्ती त्याच दिवशी म्हणजे 14 जुलै रोजी रात्री 11.59 वाजता होईल. उद्यतिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत सोमवार, 14 जुलै रोजी पाळले जाणार आहे.
संकष्टी चतुर्थीला शुभ मुहूर्त 14 जुलै रोजी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.11 ते 4.52 पर्यंत आहे. तर अभिजीत मुहूर्त सकाळी 11.59 ते दुपारी 12.55 पर्यंत राहील. या काळामध्ये पूजा करणे शुभ मानले जाते. त्याच दिवशी अमृत-सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 5.33 ते 7.16 पर्यंत असतो, तर शुभ-उत्तम मुहूर्त सकाळी 9 ते 10.43 पर्यंत असतो.
संकष्टी चतुर्थीला 4 शुभ योग तयार होत आहे. या दिवशी सोमवार आहे. आयुष्मान योग आणि सौभाग्य योग तयार होत आहे. त्यासोबतच धनिष्ट आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होत आहेत. संकष्टी चतुर्थीला आयुष्मान योग सकाळपासून सायंकाळी 04:14 पर्यंत असेल त्यानंतर सौभाग्य योग तयार होईल. धनिष्ठा नक्षत्र हे सकाळपासून 6.49 पर्यंत असते, त्यानंतर शतभिषा नक्षत्र असते.
संकष्टी चतुर्थीला चंद्रोद्याची पूजा करण्याची वेळ रात्री 9.55 वाजता आहे. या वेळी चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडला जातो. त्यासोबतच चंद्राला जल अर्पण करुन त्याची पूजा केली जाते. दुधामध्ये कच्चे दूध, संपूर्ण तांदूळ, पांढरे चंदन आणि पांढरी फुले घालून जल अर्पण करा.
संकष्टी चतुर्थीला उपवास करुन गणपती बाप्पाची पूजा केल्याने भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात. नाश करणाऱ्या भगवान गणेशाच्या आशीर्वादाने वाईटाचा नाश होतो आणि जीवनात शुभता वाढते. तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेल्या समस्येपासून सुटका होते, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)