Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankashti Chaturthi 2026: एप्रिल महिन्यात कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ

वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 01, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • संकष्टी चतुर्थी कधी आहे
  • संकष्टी चतुर्थी मुहूर्त आणि महत्त्व
  • संकष्टी चतुर्थीला चंद्रोद्याची वेळ काय आहे
 

सनातन धर्मात संकष्टी चतुर्थी अत्यंत विशेष मानले जाते. या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास करतात. हा उपवास प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळला जातो. संकष्टी चतुर्थीचा उपवास विघ्नहर्ता भगवान गणेशाला समर्पित आहे. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. या चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास पाळला जातो आणि चंद्रोद्याची वेळी चंद्राला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो.

धार्मिक श्रद्धेनुसार, विकट संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने गणपती प्रसन्न होतो आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. संकष्टी चतुर्थी कधी आहे, मुहूर्त आणि चंद्रोद्याची वेळ जाणून घ्या

कधी आहे संकष्टी चतुर्थी

या वर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण चतुर्थी तिथीची सुरुवात रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ११:५९ वाजता होणार आहे आणि या तिथीची सांगता ६ एप्रिल रोजी दुपारी २:१० वाजता होईल. अशा वेळी उद्यतिथीनुसार संकष्टी चतुर्थी रविवार, 5 एप्रिल रोजी आहे.

Muktai abhang: मुक्ताबाईंच्या ताटी उघडा अभंगातून मिळणारी प्रेरणा, जाणून घ्या

संकष्टी चतुर्थी मुहूर्त

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त ५ एप्रिल रोजी सकाळी ७:४१ ते दुपारी १२:२४ वाजेपर्यंत असेल. यावेळी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:३५ ते ५:२१ पर्यंत असेल. तसेच अभिजीत मुहूर्त सकाळी ११:५९ ते दुपारी १२:४९ पर्यंत असेल. लाभ-उन्नती मुहूर्त सकाळी ९:१५ ते सकाळी १०:५० पर्यंत असेल. अमृत-सर्वोत्तम मुहूर्त सकाळी १०:५० ते दुपारी १२:२४ पर्यंत असेल.

संकष्टी चतुर्थीला पूजा करण्याची पद्धत

विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करा. मग, हातात पाणी घेऊन गणपतीसमोर पार्थना करा. त्यानंतर, देवघरात किंवा घरातील एखाद्या शांत कोपऱ्यात आसनावर लाल वस्त्र अंथरा आणि त्यावर गणपतीची मूर्ती किंवा चित्र ठेवा. यानंतर, गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने गणपतीला स्नान घाला.

त्यानंतर गणपतीच्या मूर्तीला शेंदूर किंवा लाल चंदनाचा टिळा लावा आणि तांदूळ अर्पण करा. पूजेदरम्यान २१ दुर्वा अर्पण करा. “ओम गण गणपतये नमः” या मंत्राचा जप करा. गणपतीला मोदक किंवा बेसनाचे लाडू अर्पण करा. दिवा लावून आणि संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. शेवटी, गणपतीची आरती करून पूजेची सांगता करा. रात्री, चांदीच्या भांड्यात किंवा कलशात थोडे दूध, अख्खे धान्य आणि फुले मिसळून चंद्राला पाणी अर्पण करा. चंद्राकडे पाहून त्याला अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर, उपवास सोडा.

चंद्रोद्याची वेळ

वैशाख संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री ९.५८ वाजता आहे.

Hanuman Jayanti 2026: वाल्मिकी रामायणामध्ये सुंदरकांडातील थरारक आणि प्रेरणादायी कथा

संकष्टी चतुर्थी महत्त्व

विकट संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी भक्त उपवास करतात. अशी श्रद्धा आहे की, जे भक्त हे व्रत पाळतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे, आर्थिक अडचणी आणि अडथळे दूर होतात. या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने कुंडलीतील चंद्र आणि बुध ग्रहांचे दोष शांत होतात, सुख-समृद्धी वाढते आणि संततीचे कल्याण होते.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: संकष्टी चतुर्थी कधी आहे

    Ans: संकष्टी चतुर्थी रविवार, 5 एप्रिल रोजी आहे

  • Que: संकष्टी चतुर्थीचे महत्त्व काय आहे?

    Ans: हा दिवस गणेश यांना समर्पित असून, व्रत केल्याने संकटे दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: या व्रताने कोणते फायदे होतात?

    Ans: अडथळे दूर होणे, मानसिक शांती मिळणे आणि कार्यसिद्धी होणे, असे फायदे मानले जातात

Web Title: Sankashti chaturthi 2026 when is sankashti chaturthi muhurta importance of moonrise time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
1

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध
2

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Shani Transit: ९ ऑक्टोबरपासून शनि बदलणार आपली चाल, या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल
4

Shani Transit: ९ ऑक्टोबरपासून शनि बदलणार आपली चाल, या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.