फोटो सौजन्य- pinterest
शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी चंद्र आणि शनीच्या युतीमुळे विष योग तयार होईल. चंद्र मीन राशीत प्रवेश करताच हा अशुभ योग तयार होईल. तसे बघितले तर शनी आधीपासूनच मीन राशीत संक्रमण करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार विष योग आव्हानात्मक मानला जातो. याचा परिणाम काही राशींच्या लोकांच्या जीवनावर होताना दिसून येईल. विष योगादरम्यान कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, जाणून घ्या
मेष राशींच्या लोकांसाठी शनि आणि चंद्र बाराव्या घरात युती करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे घर खर्च, नुकसान आणि परदेश प्रवासाशी संबंधित आहे. परिणामी, विष योगाच्या प्रभावामुळे तुमचा अनावश्यक खर्च वाढू शकतो, ज्यामुळे तुमचे आर्थिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे.
या काळात तेलकट किंवा बाहेरचे अन्न खाणे टाळा. प्रवासादरम्यान आपल्या वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. मानसिक शांती मिळविण्यासाठी नियमित ध्यान आणि योगासने करणे फायदेशीर ठरेल. या योगाचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी, भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी ही युती आठव्या घरात होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आठवे घर आकस्मिक घटना, अडथळे आणि अनिश्चिततेशी संबंधित आहे. त्यामुळे, वाहन चालवताना तुम्ही विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. पैसे उधार देण्यापूर्वी किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.
आरोग्याच्या दृष्टीने, पोटाशी संबंधित समस्या चिंतेचा विषय ठरू शकतात.आरोग्याच्या दृष्टीने, पोटाशी संबंधित समस्या चिंतेचा विषय ठरू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. विष योगाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करणे फायदेशीर मानले जाते.
मीन राशींच्या लोकांसाठी त्यांच्या कुंडलीमध्ये विष योग पहिल्या घरात तयार होईल. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या चालू असलेल्या कामात अडथळे येण्याचीही शक्यता आहे. मानसिक ताण, दुःख आणि अनावश्यक चिंता तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात. त्यामुळे, या काळात सकारात्मक मानसिकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे. विष योगाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी मीन राशीच्या व्यक्तींनी काळ्या तिळाचे दान करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: शनि चंद्राच्या युतीमुळे विष योग २० नोव्हेंबरला तयार होत आहे
Ans: ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि चंद्र एकाच राशीत आल्यास किंवा विशिष्ट युतीत असल्यास विष योग तयार होतो, असे मानले जाते.
Ans: विष योगादरम्यान मेष, सिंह आणि मीन राशींच्या लोकांनी सावध राहावे






