फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रह आपले संक्रमण करत असतात. या संक्रमणाचा परिणामामुळे विविध प्रकारचे योग तयार होतात. त्या योगाचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम झालेला दिसून येतो. या योगाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर शुभ अशुभ दिसून येतात. मात्र, या योगामुळे काही राशीच्या लोकांवर त्याचा शुभ परिणाम होतो तर काहींना समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्राच्या मते, षडाष्टक योग हा व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख आणि अडचणी घेऊन येणारा योग आहे.
यावेळी तयार होणारा षडाष्टक योग हा काही राशींच्या लोकांसाठी आव्हानात्मक आणि संघर्षाचा असू शकतो. या योगामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक समस्या, आरोग्य आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यामुळे काही राशीच्या लोकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे, जाणून घ्या
कर्क राशीच्या लोकांना षडाष्टक योगामुळे व्यवसायात समस्या जाणवू शकतात. तर या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. यामुळे या राशीच्या लोकांनी बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे. अन्यथा अपचन किंवा संसर्ग यासारखे पोटाचे आजार होऊ शकतात. विद्यार्थी अभ्यासात रस दाखवत नाही त्यामुळे पालकांची चिंता वाढू शकते. या लोकांना व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुमचे कोणाशीही भांडणे होऊ शकतात. तसेच तुम्ही रागावर नियंत्रण ठेवायला हवे.
तूळ राशीच्या लोकांना षडाष्टक योगामुळे आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. यावेळी या लोकांच्या आर्थिक खर्चात वाढ होऊ शकते. अनावश्यक खर्च करणे टाळावे. या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. या लोकांचे किरकोळ आजार वाढू शकतात जसे की डोकेदुखी, तणाव, थकवा यांसारख्या समस्या. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही गोष्टीत गुंतवणूक करताना सावध राहावे.
मकर राशीच्यो लोकांना षडाष्टक योगाचा परिणाम मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरु शकतो. यामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या रागामुळे तुमच्या परिवारामध्ये मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो. आर्थिक खर्च करताना सावधगिरी बाळगावी लागेल. कोणालाही पैसे उधार देताना किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. गाडी चालवताना काळजी घ्यावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)