Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shakambhari Navratri 2025: काय आहे शाकंभरी नवरात्रोत्सवाची परंपरा, कधी आणि कशी झाली सुरुवात जाणून घ्या

नवदुर्गेचा अवतार शाकंभरी म्हणून समर्पित आहे. या देवीला फळ, फूल, अन्न आणि भाज्यांची देवी म्हणून मानले जाते. ही नवरात्र पौष महिन्यातील अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत साजरी केली जाते. कधी आहे शाकंभरी नवरात्र जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 25, 2025 | 11:37 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे काय
  • शाकंभरी नवरात्रोत्सवाची परंपरा
  • शाकंभरी नवरात्रोत्सवाची सुरुवात
शाकंभरी नवरात्रीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. हे देवी दुर्गाचे अवतार शाकंभरी देवीला समर्पित आहे. या देवीला फळ, फूल, अन्न आणि भाज्यांची देवी म्हणून मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, ज्यावेळी दुष्काळ पडला होता आणि भयावह परिस्थिती उद्भवली होती तेव्हा दुर्गा देवीने अवतार घेतला होता. त्यामुळे या देवीला शाकंभरी असे म्हटले जाते. ही नवरात्र पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होते आणि पौर्णिमेला समाप्त होते. हा सण मुख्यतः राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जाणून घेऊया शाकंभरी नवरात्र म्हणजे काय, पूजा करण्याची पद्धत

कधी आहे शाकंभरी नवरात्र

पंचांगानुसार यावर्षी शाकंभरी नवरात्रीची सुरुवात 28 डिसेंबरपासून होत आहे आणि या उत्सवाचे समाप्ती 3 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. यावेळी शाकंभरी नवरात्र नऊ दिवस नसून आठ दिवस असणार आहे.

शाकंभरी नवरात्र पूजा पद्धत

कलश स्थापना

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलशाची स्थापना करावी जसे आपण चैत्र नवरात्र किंवा शारदीय नवरात्रीत करतो त्या पद्धतीने करावे.

New Year Vastu Tips: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करा ‘हे’ सोपे उपाय, वर्षभर मिळतील शुभ परिणाम

देवीचे स्वरूप

शाकंभरी देवीच्या मूर्तीची स्थापना करावी किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून देवी दुर्गाची प्रतिमा ठेवावी. देवीला लाल रंगांचे वस्त्र अर्पण करून 16 श्रृंगार अर्पण करावा.

नैवेद्य अर्पण करा

देवीला फळ, भाजी आणि मिठाई अर्पण करावी.

मंत्रांचा जप

शाकंभरी देवीच्या पूजेच्या वेळी ओम ही श्रीं क्ली भगवती शाकंभरी देव्यै नमः या मंत्रांचा 108 वेळा जप करावा.

आरती

दुर्गा सप्तमीचे पठण करून आरती करा

दान

या नवरात्रीच्या वेळी गरीब आणि गरजूवंतांना माझी फळ आणि अन्नधान्यांचे दान करावे. यामुळे पैशाची कमतरता दूर होते.

हवन

अष्टमी आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष हवन आणि पूजा केली जाते. त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी व्रताची समाप्ती होते.

नाताळाच्या दिवशी मंगळ करणार वर्षातील शेवटचे संक्रमण, सिंह आणि कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

हे काम करु नका

यावेळी सर्व तामासिक गोष्टींपासून दूर राहा.

शाकंभरी देवीचे महत्त्व

पृथ्वीवरील दुष्काळ संपवण्यासाठी माझ्या धान्य आणि हिरवळ निर्माण करणाऱ्या देवी शक्तीचे रूप म्हणून शाकंभरी देवीला मानले जाते. म्हणूनच या देवीला वनस्पती पीके आणि पोषणाची देवी असे म्हटले जाते.

देवींच्या प्रतिमांमध्ये हिरवळीने वेढलेले चित्रण केलेले आहे. जे समृद्धी , प्रजनन, क्षमता आणि जीवनाचे प्रतीक आहे. या देवीची पूजा निसर्ग आणि मानवी जीवनातील खोल संबंध प्रतिबिंबित करते काही ठिकाणी ती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरी केली जाते.

या मंत्रांचा जप करा

ॐ ह्रीं श्रीं क्लीं भगवति माहेश्वरी अन्नपूर्णा स्वाहा

ॐ महानारायण्यै च विदमहे महादुर्गायै धीमहि तन्नो शाकम्भरी: प्रचोदयात्॥

ॐ सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य: सुतान्वित:। मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:

शाकैः पालितविष्टपा शतदृशा शाकोल्लसद्विग्रहा । शङ्कर्यष्टफलप्रदा भगवती शाकम्भरी पातु माम् ॥

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे काय?

    Ans: शाकंभरी नवरात्रोत्सव हा देवी दुर्गेच्या शाकंभरी रूपाची उपासना करण्यासाठी साजरा केला जाणारा विशेष नवरात्र उत्सव आहे. या नवरात्रात देवी अन्नपूर्णा व पालनकर्ती स्वरूपात पूजिली जाते.

  • Que: देवी शाकंभरी कोण आहेत?

    Ans: देवी शाकंभरी या देवी दुर्गेचे एक रूप असून त्या अन्न, धान्य, फळे आणि शाकाहाराची देवी मानल्या जातात. दुष्काळाच्या काळात सृष्टीचे पालन करणाऱ्या देवी म्हणून त्यांची पूजा केली जाते.

  • Que: शाकंभरी नवरात्रात कोणती पूजा केली जाते?

    Ans: या नवरात्रात देवीला फळे, भाज्या, धान्य आणि हिरव्या पानांची अर्पण केली जाते. विशेषतः अन्नदानाला फार महत्त्व दिले जाते.

Web Title: Shakambhari navratri 2025 what is tradition mode of worship and significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश
1

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश

Shravan 2026: हिरव्या बांगड्यांचा श्रावणाशी काय संबंध? जाणून घ्या धार्मिक आणि ज्योतिषीय कारण
2

Shravan 2026: हिरव्या बांगड्यांचा श्रावणाशी काय संबंध? जाणून घ्या धार्मिक आणि ज्योतिषीय कारण

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Astrology 2026: स्वातंत्र्यदिनी घडणार एक मोठा योगायोग, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार मोठी संधी
4

Astrology 2026: स्वातंत्र्यदिनी घडणार एक मोठा योगायोग, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.