Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Amavasya 2026: शनिचरी अमावस्येला या राशींच्या लोकांनी राहा जपून, नात्यांमध्ये निर्माण होऊ शकतो तणाव

Shani Amavasya 2026: शनिवार, १० ऑक्टोबर रोजी शनी अमावस्या आणि सर्वपित्री अमावस्या एकाच दिवशी आल्या आहेत. या दिवशी मेष राशीसह इतर राशींच्या लोकांनी सावधिगिरी बाळगणे गरजेचे आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा गोष्टी बिघडू शकतात. शनिचरी अमावस्येच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 10, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनिचरी अमावस्या आणि सर्वपित्री अमावस्या एकाच दिवशी
  • शनि अमावस्येला या राशींच्या लोकांनी राहावे जपून
  • कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी
शनिवार, १० ऑक्टोबर रोजी शनिचरी अमावस्या आहे. या दिवशी भगवान शनिची पूजा करून शनिशी संबंधित वस्तूंचे दान केले जाते. यामुळे साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळते, तसेच त्यांच्याशी संबंधित दुःखही कमी होते. शनि अमावस्येच्या दिवशी काही राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा कोणीतरी त्यांची फसवणूक करू शकते किंवा एखादे गुपित उघड होऊ शकते.

शनि अमावस्या आणि सर्वपित्री अमावस्या यावेळी एकाच दिवशी येत आहे. हा योग ३१ वर्षांनंतर जुळून आला आहे. या योगाला महासंयोग असे देखील म्हटले जाते. या दिवशी काही वस्तूंचे दान करणे फायदेशीर मानले जाते. शनिचरी अमावस्येच्या दिवशी कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे जाणून घ्या

शनि अमावस्येच्या दिवशी या राशींच्या लोकांनी राहावे सावध

मेष रास

शनी अमावस्येच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना इतरांकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. तुम्ही विश्वास ठेवलेली व्यक्ती तुमचा गैरफायदा घेत आहे. तुम्ही इतरांच्या प्रभावाखाली येऊन चुकीचे निर्णय घेऊ शकता, म्हणून स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. गुंतवणुकीच्या बाबतीतही इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच चौकशी करणे उत्तम.

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला या गोष्टीचे दान केल्याने जीवनात येऊ शकते सुख समृद्धी

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांनी शनी अमावस्येच्या निमित्ताने कोणतीही गोष्ट शेअर करताना सावधगिरी बाळगावी. तुमची गुपिते उघड होण्याचा धोका असतो, ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. धूर्त लोकांपासून सावध रहा. खूप घाई केल्यास तुमचे नुकसान होईल.

वृश्चिक रास

तुमच्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून सतर्क राहावे. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्या बॉसला तुमच्या विरोधात भडकवू शकते. इतरांविषयी बोलताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वाईट लोकांच्या संगतीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

मकर रास

मकर राशीच्या व्यक्तींना शनी अमावस्येच्या दिवशी एकटेपणा जाणवू शकतो. आपले मन कमजोर होऊ देऊ नका, अन्यथा तुम्ही नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकू शकता. कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतात. राग आणि चिडचिड वाढू शकते. अशा परिस्थितीत आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. आपल्या कामात प्रामाणिक रहा, अन्यथा तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते.

Numberlogy:  सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

मीन रास

शनि अमावस्येच्या निमित्ताने मीन राशीच्या लोकांना आपल्या बोलण्यात आणि वागण्यात संयम बाळगण्याची गरज आहे. मानसिक विकार आणि समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. या काळात कोणतेही नवीन काम हाती घेणे टाळा, कारण त्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. अशा वेळी, तुम्ही तुमच्या वरिष्ठांचा आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेऊ शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shani amavasya 2026 people of these zodiac signs should be careful pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • amavasya
  • astrology news
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
1

Numberlogy: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला या गोष्टीचे दान केल्याने जीवनात येऊ शकते सुख समृद्धी
2

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येला या गोष्टीचे दान केल्याने जीवनात येऊ शकते सुख समृद्धी

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाशी संबंधित करा हे विशेष उपाय, पूर्वज आणि शनिदेव होतील प्रसन्न
3

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाशी संबंधित करा हे विशेष उपाय, पूर्वज आणि शनिदेव होतील प्रसन्न

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र
4

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.