फोटो सौजन्य- pinterest
22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीची सरुवात होत आहे आणि याची समाप्ती 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या काळात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाणार आहे. नवरात्रीचा हा काळ धार्मिकदृष्ट्या नाही तर ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार खूप महत्त्वाचा आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंगळ तूळ राशीमध्ये, शुक्र सिंह राशीमध्ये, सूर्य कन्या राशीमध्ये आणि शनि मीन राशीमध्ये असणार आहे. याशिवाय 24 सप्टेंबर रोजी चंद्र तूळ राशीमध्ये संक्रमण करेल आणि मंगळासोबत महालक्ष्मी योग तयार करेल. अशा वेळी ग्रहांची विशेष स्थिती आणि देवीच्या आशीर्वादाने शारदीय नवरात्रीमध्ये काही राशीच्या लोकांना या शुभ योगाचा फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना व्यवसाय, आर्थिक स्थिती, समाजात मान सन्मान, करिअरमध्ये अपेक्षित यश, कुटुंब यांसारख्या गोष्टींसाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे. नवरात्रीमध्ये कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
तूळ राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करु शकता. व्यवसायामध्ये दीर्घकाळापासून कोणतेही काम अडकले असेल ते पूर्ण होईल. आर्थिक स्थिरता राहील त्यासोबतच तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. करिअरच्या बाबतीत कोणताही निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्याल. कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या दूर होतील.
मकर राशीच्या जीवनात नवरात्रीच्या काळामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतील. कामाच्या ठिकाणी तुमची वरिष्ठांकडून प्रशंसा होऊ शकते आणि तुम्हाला बढती देखील मिळू शकते. आर्थिक लाभासोबत उत्पन्नाच्या संधी देखील मिळतील. विद्यार्थ्यांसाठी नवरात्रीचा हा काळ खूप चांगला राहील. ज्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला बाहेर आणि घरामध्ये दोन्ही ठिकाणी सन्मान मिळेल.
कुंभ राशीच्या जीवनात नवरात्रीच्या काळामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतील. या काळात तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. आरोग्य चांगले राहील. समजदारीने काम केल्याने चांगले फायदे होतील. करिअरच्या बाबतीत तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. यावेळी व्यवसायात तुम्हाला नवीन क्लाइंट मिळू शकतात. जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. जे लोक नोकरी बदलू इच्छित आहे किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहे त्यांना अपेक्षि यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)