Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Shardiya Navratri 2026 Date: २०२६ मधील शारदीय नवरात्र ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून २० ऑक्टोबरला दसरा आहे. प्रतिपदा तिथी १० ऑक्टोबरच्या रात्री ९.१९ वाजता सुरू होऊन ११ ऑक्टोबरच्या रात्री ९.३० वाजता संपेल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 29, 2026 | 01:29 PM
Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ११ ऑक्टोबर २०२६पासून
  • घटस्थापना मुहूर्त
  • अष्टमी १८ ऑक्टोबर, नवमी १९ ऑक्टोबर
नवरात्र आली की सगळीकडे एकदम प्रसन्न वाटतं. देवीचा सण, नऊ दिवस उपवास, जागरण, गरबा. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्व आहे. या नऊ दिवसात दुर्गा माता पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देते अशी मान्यता आहे. नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या देवींची पूजा केली जाते.आता सगळ्यांना प्रश्न पडला आहे की २०२६ ची नवरात्र नक्की कधी आहे? घट बसवायचा मुहूर्त काय आहे? Shardiya Navratri 2026 Date:

२०२६ मध्ये नवरात्र कधी सुरु होणार? पंचांगानुसार यंदाची शारदीय नवरात्र ऑक्टोबर महिन्यात आहे. प्रतिपदा १० ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी सुरू होईल आणि ११ ऑक्टोबरला रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी संपेल. हा नवरात्रीचा पहिला दिवस रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ ला असेल. आणि शेवटचा दिवस म्हणजे दसरा २० ऑक्टोबरला आहे. ११ ते २० ऑक्टोबर हे नऊ दिवस देवीचे असतील.

घटस्थापनेसाठी चांगला मुहूर्त कोणता?

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवतात. त्यालाच कलश स्थापना म्हणतात. यंदा मुहूर्त सकाळचा आहे.सकाळी ६ वाजून १९ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून १२ मिनिटांपर्यंत घट बसवण्यासाठी शुभ वेळ आहे. जर सकाळी नाही जमलं तर दुपारी अभिजीत मुहूर्त आहे. तो ११ वाजून ४४ मिनिटांपासून १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत आहे. या वेळेत घट बसवला तर खूप चांगलं असतं.

अष्टमी, नवमी कधी आहे?

यंदा अष्टमी १८ ऑक्टोबरला आहे. या दिवशी महाअष्टमीचा उपवास धरला जातो. यावर्षी नवमी १९ ऑक्टोबरला असून सकाळी १० वाजून ५१ मिनिटांपर्यंत अष्टमी आणि नंतर नवमी लागेल. नवमीला हवन करतात. हवनासाठी सगळ्यात चांगली वेळ १९ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजून ४४ ते दुपारी १२ वाजून ३० पर्यंत आहे. यावेळी हवन केलं की पूर्ण नवरात्रीचं पुण्य मिळतं असं सांगतात.

Shardiya Navratri 2025: लवकर सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्रीला …

घट घरी कसा बसवायचा?

पहिल्या दिवशी घरातला ईशान्य कोपरा स्वच्छ करा. तिथे गंगाजल शिंपडा.तिथे एक पाट ठेवा, त्यावर नवीन लाल कापड टाका आणि देवीचा फोटो ठेवा. पाटासमोर एक मातीचं परळ घ्या. त्यात थोडी माती टाका आणि त्यावर जव टाका. परत त्यावर थोडी माती टाका आणि थोडं पाणी शिंपडा. नऊ दिवसात हे जव छान वाढतं.आता एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश घ्या. त्याच्या गळ्याला लाल धागा बांधा आणि कुंकवाने स्वस्तिक काढा. त्यात स्वच्छ पाणी भरा, त्यात गंगाजल टाका. त्यात एक रुपयाचं नाणं, सुपारी, थोडे तांदूळ, दुर्वा आणि हळद टाका.कलशाच्या तोंडावर ५ आंब्याची पानं ठेवा. एक नारळ घ्या, त्याला लाल कापड गुंडाळा आणि कलशावर ठेवा. नारळाचं तोंड आपल्याकडे असू द्या.

हा कलश त्या जवाच्या परळाच्या मधोमध ठेवा. हातात पाणी, फुलं घेऊन देवीला सांगा की मी नऊ दिवस तुझी पूजा करणार आहे. नंतर दिवा लावा, अगरबत्ती लावा. देवीला कुंकू, तांदूळ, फुलं, फळं द्या. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची गोष्ट वाचा.

Shardiya Navratri 2025: यंदा नवरात्रीमध्ये अष्टमी 1 की 2 ऑक्टोबर कधी …

नवरात्रीचे नऊ दिवस कोणत्या देवीचे?

११ ऑक्टोबर – शैलपुत्री
१२ ऑक्टोबर – ब्रह्मचारिणी
१३ ऑक्टोबर – चंद्रघंटा
१४ ऑक्टोबर – कुष्मांडा
१५ ऑक्टोबर – स्कंदमाता
१६ ऑक्टोबर – कात्यायनी
१७ ऑक्टोबर – कालरात्री
१८ ऑक्टोबर – महागौरी – अष्टमी
१९ ऑक्टोबर – सिद्धिदात्री – नवमी
२० ऑक्टोबर – दसरा, विसर्जन
या नऊ दिवसात मनापासून देवीची पूजा करा. घरात सुख, पैसा आणि आरोग्य नक्की येईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shardiya navratri 2026 date ghatasthapana muhurat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • hindu religion
  • navratri day
  • religion news
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha 2026:  पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता
1

Pitru Paksha 2026: पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते
2

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय
3

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
4

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.