Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan 2025: पहिल्या श्रावणी शुक्रवारी या शुभ योगामध्ये करा पूजा, जाणून घ्या पद्धत आणि नियम

शुक्रवार, 25 जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. यावेळी पहिला श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आहे. या दिवशी काही शुभ योग तयार होत आहे. या योगामध्ये देवीची पूजा केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 24, 2025 | 03:45 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार उद्या म्हणजे 25 जुलै रोजी आहे. या दिवशी सूर्य देव कर्क राशीत असेल आणि चंद्र कर्क राशीत असेल. शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो. यावेळी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रावणातील शुक्रवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी महिला उपवास देखील करतात. पंचांगानुसार, या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल आणि त्याची समाप्ती दुपारी 12.55 वाजता होईल. त्याचसोबत राहू काळ सकाळी 10.45 ते दुपारी 12.28 पर्यंत असेल. या दिवशी वृद्धी योग सायंकाळी 7.28 वाजता सुरु होऊन रात्रभर राहील.

शुक्रवारचे व्रत केल्याने वाढेल सुख समृद्धी

शुक्रवारचा उपवास प्रामुख्याने संतोषी माता आणि देवी लक्ष्मीला समर्पित असतो. मात्र श्रावणातल्या शुक्रवारचे व्रत हे जिवतीला समर्पित आहे. असे म्हटले जाते की, हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी, संपत्ती आणि शांती मिळते. तसेच या वेळी विधीनुसार पूजा केल्याने सर्व दुःखे नष्ट होऊन देवी तिच्या भक्तांचे सर्व संकटांपासून रक्षण करते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते, अशी मान्यता आहे.

Nag Panchami: तुम्हालाही वाईट स्वप्न येत आहे का? नागपंचमीला ‘हे’ उपाय केल्याने कालसर्प दोषापासून होईल सुटका

शुक्रवारी हे व्रत केल्याने शुक्र ग्रहाला बळकटी मिळते. तसेच त्याच्या संबंधित काही दोष असल्यास ते दूर होण्यासही मदत होते. हे व्रत कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या शुक्रवारपासून सुरू करता येते. सहसा हे व्रत सलग 16 शुक्रवार पाळले जाते, त्यानंतर उद्यापन केले जाते.

शुक्रवारी देवीची पूजा कशी करावी

शुक्रवारी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करुन झाल्यानंतर देव्हाऱ्याची साफसफाई करुन घ्यावी.

त्यानंतर एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ कापड पसरावे आणि त्यावर पूजेचे साहित्य ठेवावे. त्यानंतर देवीची मूर्ती ठेवून कलशाची स्थापना करावी.

यावेळी श्री यंत्रांची स्थापना करणे देखील शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीला सिंदूर, तांदूळ, फुले आणि माळ अर्पण करुन तुपाचा दिवा लावा आणि धूप अर्पण करावे. देवीला फळे अर्पण करावे.

त्यानंतर व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. नंतर मंत्रांचा जप करुन आरती करावी. पूजा करुन झाल्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन ते घरभर शिंपडावे आणि नंतर ते पाणी तुळशीला अर्पण करावे.

देवीची पूजा झाल्यांतर देवीला खीर आणि पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. लक्ष्मी मंत्राचा जप करावा. पूजा करताना देवी लक्ष्मीला पिवळ्या कढई अर्पण करा. पूजा संपल्यानंतर त्या तिजोरीत ठेवा. तुमच्या संपत्तीत वाढ होईल.

Surya Gochar: 3 ऑगस्टपासून सूर्याच्या कृपेने या लोकांचा वाढेल आदर, मिळतील नोकरीच्या नवीन संधी

शुक्रवार व्रताचे नियम

मान्यतेनुसार, शुक्रवारी जर तुम्ही देवीच्या व्रताचा उपवास करत असाल मिठाचा वापर करु नये.

तुम्ही दिवसातून एकदा गोड पदार्थासोबत कोणतेही एक धान्य खाऊ शकता, जसे की खीर-पुरी.

शुक्रवारी जर कोणी व्रत ठेवले असल्यास त्या दिवशी घरातील सदस्यांनी कांदा, लसूण, मांस, मद्य इत्यादी मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नये.

या दिवशी ब्राह्मण, गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करावे आणि त्यांना दक्षिणा देणे देखील शुभ मानले जाते.

शुक्रवारच्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार, तांदूळ, पांढरे कपडे, साखर, दूध इत्यादी गोष्टींचे दान करणे देखील चांगले मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shravan 2025 first shravani friday auspicious yoga puja method rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

Kuldevta: कुलदैवताला चांदीचा टाक जेजुरीवरूनच का आणतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि परंपरा
1

Kuldevta: कुलदैवताला चांदीचा टाक जेजुरीवरूनच का आणतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि परंपरा

Matsya Purana: प्रलयापासून सृष्टीच्या पुनर्निर्मितीपर्यंत! मत्स्य पुराणातील महत्त्वाच्या कथा आणि रहस्ये
2

Matsya Purana: प्रलयापासून सृष्टीच्या पुनर्निर्मितीपर्यंत! मत्स्य पुराणातील महत्त्वाच्या कथा आणि रहस्ये

New Vehicle Pooja: नवीन वाहनाची पूजा का केली जाते? गरुडाशी संबंधित धार्मिक श्रद्धा जाणून घ्या
3

New Vehicle Pooja: नवीन वाहनाची पूजा का केली जाते? गरुडाशी संबंधित धार्मिक श्रद्धा जाणून घ्या

Shivlilamrut: शिवकथा श्रवणाने पिशाच योनीतील जीवांनाही सद्गती? जाणून घ्या शिवलीलामृतच्या बाराव्या अध्यायाचे माहात्म्य
4

Shivlilamrut: शिवकथा श्रवणाने पिशाच योनीतील जीवांनाही सद्गती? जाणून घ्या शिवलीलामृतच्या बाराव्या अध्यायाचे माहात्म्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.