फोटो सौजन्य- pinterest
कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्यास तुम्हाला सतत वाईट स्वप्न पडू शकतात. यावेळी स्वप्नात सतत साप दिसणे किंवा मेहनत करुनही कामामध्ये अपेक्षित यश न मिळणे. यांसारख्या समस्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास उद्भवतात.
हिंदू धर्मातील पवित्र महिना म्हणून श्रावण महिना मानला जातो. या महिन्यात अनेक व्रत वैकल्य येतात. त्यापैकी एक म्हणजे नागपंचमी. दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. यंदा ही तिथी मंगळवार, 29 जुलै रोजी आहे. बरेच जण सापांना घाबरतात पण या दिवशी न घाबरता त्यांची पूजा केली जाते. काही लोक नागांची मूर्ती घरी आणून किंवा त्यांचे चित्र काढून पूजा करतात. हिंदू धर्मामध्ये सापाला देवतेचा दर्जा देण्यात आलेला आहे. नागपंचमीच्या दिवशी बरेच जण उपवास देखील करतात. नागपंचमीच्या दिवशी ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहेत त्यांनी काही उपाय करावे त्यामुळे कालसर्प दोषातून सुटका होते, असे म्हटले जाते. कालसर्प दोषाचे उपाय जाणून घ्या
यंदा नागपंचमी मंगळवार, 29 जुलै रोजी आहे. यावेळी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5.41 ते 8.23 पर्यंत असेल. म्हणजेच या दिवशी पूजा करण्यासाठी एकूण कालावधी 2 तास 43 मिनिटे असेल.
असे म्हटले जाते की, तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्यास तुम्हाला वारंवार भयानक स्वप्न पडतात. स्वप्नामध्ये साप दिसल्यामुळे व्यक्ती घाबरू शकतात. तसेच कठोर मेहनत करुनही तुम्हाला अपेक्षित यश न मिळणे. त्यासोबतच दोषामुळे कामाच्या आणि कुटुंबामध्ये वादाची परिस्थिती निर्माण होणे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्याच्या शत्रूंची संख्या वाढतच जाते.
जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्यास नागपंचमीच्या दिवशी महादेवांची पूजा करावी. पूजा करतेवेळी महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. त्यासोबतच गंगाजलामध्ये काळे तीळ मिसळून त्याचा शिवलिंगावर अभिषेक केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि कालसर्प दोषापासून सुटका होण्यास मदत होते. याशिवाय नागपंचमीच्या दिवशी चांदी किंवा तांब्यापासून बनवलेल्या सापांच्या जोडीला पवित्र नदीत तरंगवावे, यामुळे कालसर्प दोषापासूनही आराम मिळतो.
मान्यतेनुसार, श्रावण महिन्यात साप पृथ्वीच्या गर्भातून बाहेर येतो आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो. त्याने कोणत्याही व्यक्तीला इजा करु नये म्हणून त्याची नागपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते, अशी मान्यता आहे. कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी बिहार, बंगाल, ओडिशा, राजस्थान इत्यादी ठिकाणी नाग देवतेची पूजा केली जाते. तर, देशातील इतर राज्यांमध्ये, शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)