फोटो सौजन्य- pinterest
महादेवाचा आवडता महिना श्रावण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यावेळी जुलै महिन्यातील मासिक शिवरात्र आज बुधवार, 23 जुलै रोजी आहे. या दिवशी काही शुभ योद देखील तयार होत आहे. यावेळी शिवाची पूजा केल्याने जीवनामध्ये येणाऱ्या सर्व समस्यांपासून सुटका होते, असे म्हटले जाते. त्या दिवशी शिवलिंगावर पाणी, दूध, तूप आणि मध अर्पण या गोष्टी अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी पूजा केल्याने जुन्या आजारांपासून मुक्तता मिळते आणि मानसिक शांती देखील मिळते.
श्रावण मासिक शिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, गजकेसरी योग, बुद्धादित्य योग आणि मालव्य योग असे शुभ योग तयार होत असल्याने या शुभ काळामध्ये पूजा आणि काही उपाय केल्याने अनेक फायदे होतात. श्रावण मासिक शिवरात्रीच्या दिवशी कोणते उपाय करावे, जाणून घ्या
जर एखाद्या व्यक्तीला कोणताही जुना किंवा गंभीर आजार असल्यास या दिवशी शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करावा. तसेच यावेळी ओम त्र्यंबकम यजमहे सुगंधिम पुष्टीवर्धनम्. या महामृत्यूजंय मंत्रांचा 108 वेळा जप करावा. त्यामुळे शारीरिक वेदना हळूहळू कमी होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.
21 बेलाची पाने घेऊन त्यावर ॐ नमः शिवाय हा मंत्र लिहावे. त्यानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करुन ही पाने त्यावर ठेवावी. हा उपाय केल्याने व्यक्तीच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.
या दिवशी शिवलिंगावर पाणी, जव आणि काळे तीळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुरु असलेल्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते आणि मानसिक शांतीही मिळते.
मासिक शिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करणे शुभ मानले जाते. तसेच “ॐ नमः शिवाय या मंत्रांचा जप करावा. त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
जर तुम्ही शनिच्या साडेसाती आणि इतर प्रभावाखाली असाल तर या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून ते शिवलिंगावर अर्पण करा. यावेळी तुम्ही शनि मंत्रांचा जप देखील करु शकता. त्यामुळे शनि दोष कमी होऊ शकतो.
श्रावण मासिक शिवरात्रीच्या दिवशी गरजूंना अन्न, कपडे आणि पाणी देणे शुभ मानले जाते. यामुळे तुमच्यातील सकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो आणि जीवनात संतुलन राखले जाते, असे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)