Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shree Swami Samarth : जेव्हा स्वामी पहिल्यांदा रडले ; गोष्ट आहे दत्तसंप्रदायातील एका थोर भक्ताची

स्वामीआई असं देखील म्हटलं जातं. याच स्वामींच्या प्रेमाची एक कथा आहे जेव्हा त्यांच्या अतिशय जवळच्य़ा भक्ताने देहत्याग केला. काय आहे ही गोष्ट जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 19, 2026 | 01:52 PM
Shree Swami Samarth : जेव्हा स्वामी पहिल्यांदा रडले ; गोष्ट आहे दत्तसंप्रदायातील एका थोर भक्ताची
Follow Us
Follow Us:
  • जेव्हा स्वामी पहिल्यांदा रडले
  • गोष्ट आहे दत्तसंप्रदायातील एका थोर भक्ताची
ब्रम्हांडनायक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते स्वामी समर्थ यांना ओळखलं जातं. स्वामींच्या लीला अक्कलकोटात सर्वांनी पाहिल्या आहेत. त्यांचं वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे तेव्हाही आणि आताही त्यांच्या भक्तांना अनेक अडचणीतून बाहेर काढायला मदत करतं. स्वामी त्यांच्या भक्तांवर आईसारखी माया करतात म्हणून देखील त्यांना स्वामीआई असं देखील म्हटलं जातं. याच स्वामींच्या प्रेमाची एक कथा आहे जेव्हा त्यांच्या अतिशय जवळच्य़ा भक्ताने देहत्याग केला. काय आहे ही गोष्ट जाणून घेऊयात.

स्वामी त्यांच्या भक्तांवर रागावतात पण तेवढंच प्रेम देखील करतात. असच स्वामींशी ज्यांचा कित्येक जन्माचं नातं होतं त्या चोळप्पा महाराजांनी जेव्हा देहत्याग केला तेव्हा स्वामी रडले होते. याबाबत अभ्यासक संकेत साने यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. तर झालं असं होतं की, स्वामींचं चोळप्पा महाराजांशी त्यांच्या गतजन्माशी संबंध होता. या जन्मात स्वामींनी चोळप्पा महाराजांना ओळख पटवून दिली. त्यानंतर चोळप्पा महाराजांनी स्वामींना त्यांच्यापासून कधीही दूर केलं नाही. स्वामी अनेकदा चोळप्पा महाराजांसमोर आव्हानं पेरीत असत त्यातून माझा भक्त चोळ्या कसा ताऊन सुलाखून बाहेर पडतो याची स्वामी परिक्षा घ्यायचे. मात्र स्वामींच्या या परिक्षेला चोळप्पा महाराज कधीच त्रासले नाही. त्यांनी स्वामींचा कधी अनादर देखील केला नाही. साक्षात ब्रम्हांडनायक माझ्या घरात वावरत आहेत याचा त्यांना आनंद वाटे. स्वामींकडे दैवीशक्ती असली तरी नियतीपुढे कोणाचं काहीही चालत नाही.

Shree Swami Samarth : दत्तगुरुंचा दृष्टांत आणि स्वामींची भेट; शंकररावांना स्वामींनी कसं वाचवलं ?

जे भाग्यात लिहिलेलं असतं ते होणारच असतं निसर्गाच्या चक्रापुढे स्वामींनी देखील कधीही हस्तक्षेप केला नाही. जेव्हा चोळप्पा महाराजांच्या भविष्यात पुढे काय वाढून ठेवलंय हे स्वामींना कळलं तेव्हा त्यांनी ते होऊ दिलं. जेव्हा चोळप्पा महाराजांचं कमी वयातच जग सोडून जाणं हे विधीलिखित होतं आणि स्वामींनी त्यात हस्तक्षेप केला नाही. चोळप्पा महाराज कायम म्हणायचे ,स्वामी तुम्ही माझ्याच घराजवळ देहत्याग कराल तेव्हा स्वामी एकदा त्यांना म्हणाले की, माझ्याआधी तू देहत्याग करशील आणि तेच झालं. जेव्हा स्वामींवर अपार विश्वास ठेवणाऱ्या त्यांच्या भक्ताचं महानिर्वाण झालं तेव्हा स्वामी चोळप्पा महाराजांसाठी ढसाढसा रडले होते. माझा चोळ्या गेला आता माझ्या लीला मी कोणाला दाखवू ? असं स्वामी म्हणाले होते. चोळप्पा महाराजांच्य़ा जाण्यानंतर काही काळातच स्वामींनी देखील त्यांच्या शेजारीच देहत्याग केला. सांगायचं तात्पर्य हेच की, चांगल्या परिस्थिती आणि कठीण काळातही तुमची तुमच्या गुरुंवर असलेली श्रद्धा आणि विश्वास किती महत्वाचा आहे त्यातून तुमची भक्ती कळते.

संपत्तीचा मोह, ‘असं’ झालं मल्हाररावांचं गर्वहरण; श्री स्वामी समर्थांना चक्क मेण्यातून पळवून नेण्याचा झालेला प्रयत्न

 

Web Title: Shree swami samarth when swami cried for the first time the story is about cholappa maharaj of the datta sampradaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • hindu religion
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
1

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण
2

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या
4

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.